महाराष्ट्र

maharashtra

Booster Dose Fraud : बूस्टर डोसच्या नावाखाली होत आहे फसवणूक; नाशिक ग्रामीण पोलिसांकडून जनजागृती

By

Published : Jan 14, 2022, 4:52 PM IST

हॅकरकडून फसवणुकीचा ( Booster Dose Fraud ) नवीन फंडा अवलंबला जात आहे. फोनकरून प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याची अचूक तारीख सांगत, त्यानंतर ओमायक्रोनचा ( Booster Dose For Omicron ) धोका टाळण्यासाठी तिसऱ्या बूस्टर डोससाठी विनंती करण्यात येत आहे. यासंदर्भात नाशिक ग्रामीण पोलिसांकडून ( Nashik Rural Police Awareness Program ) जनजागृती करण्यात येत आहे.

Nashik Rural Police Awareness Program
Nashik Rural Police Awareness Program

नाशिक -हॅकरकडून फसवणुकीचा ( Booster Dose Fraud ) नवीन फंडा अवलंबला जात आहे. फोनकरून प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्याची अचूक तारीख सांगत, त्यानंतर ओमायक्रोनचा ( Booster Dose For Omicron ) धोका टाळण्यासाठी तिसऱ्या बूस्टर डोससाठी विनंती करण्यात येत आहे. तसेच मोबाईलवर पाठवलेला ओटीपी सांगा, असे म्हणत व्यक्तीच्या बँक खात्यातून रक्कम काढली जात आहे. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांकडून ( Nashik Rural Police Awareness Program ) जनजागृती करण्यात येत आहे.

अशा प्रकारे होते फसवणूक -

राज्यासह नाशिक जिल्ह्यात तिसऱ्या लाटेत कोरोना बधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण आहे. अनेकांनी दोन डोस घेतल्यानंतर सुद्धा कोरोना बाधित होत आहे. त्यामुळे भीती अधिकच वाढली आहे. याचाच फायदा घेत आता सायबर हॅकरांनी नवीन फंडा वापरत नागरिकांची फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. या नवीन प्रकारात हॅकर कॉल करत फोनवरील व्यक्ती त्यांच्या लसीकरणाची अचूक तारीख सांगून बूस्टर डोससाठी विनंती करतो. नंतर संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर ओटीपी पाठवला जातो आणि तो नंबर हॅकरला दिल्यानंतर संबंधितांची बँक खाते हॅक करत रक्कम काढून घेतली जाते.

नागरीकांनी सतर्क राहावे -

बूस्टर डोससाठी मोबाईलवर येणारे कॉल फसवे आहेत. तुम्हाला कोणी यासाठी विनंती करत असेल व ओटीपी पाठवला असेल, तर त्याला प्रतिसाद देऊ नका, हा हॅकिंगचा नवीन फंडा आहे. शहर आणि ग्रामीण भागात स्थानिक पोलिसांना अशाप्रकारे गुन्हेगार टाळण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी अशा फोन कॉलपासून सतर्क राहावे, असे आवाहन नाशिक ग्रामिण पोलिसांकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा -Bull Bai App Case : श्‍वेता सिंग, मयंक रावलला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details