महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik RTO Revenue : लकी नंबरसाठी नाशिककरांची पसंती, आरटीओ विभागाला मिळाला 5 कोटी 65 लाखांचा महसूल - नाशिक आरटीओ नंबर प्लेट महसूल

परिवहन विभागाला यंदा पसंती ( Nashik RTO Favorite Number Plate ) क्रमांकाच्या माध्यमातून 5 कोटी 65 लाख 94 हजार 500 रुपयांचा निधी ( RTO Revenue From Number Plate ) मिळाला आहे. वाहन खरेदी केल्यावर आपल्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनाला पसंती क्रमांक मिळावा, यासाठी वाहनधारक दरवर्षी हजारो लाखो रुपये मोजत असतात.

Nashik RTO Favorite Number Plate
Nashik RTO Favorite Number Plate

By

Published : Apr 22, 2022, 8:19 PM IST

नाशिक - परिवहन विभागाला यंदा पसंती ( Nashik RTO Favorite Number Plate ) क्रमांकाच्या माध्यमातून 5 कोटी 65 लाख 94 हजार 500 रुपयांचा निधी ( RTO Revenue From Number Plate ) मिळाला आहे. वाहन खरेदी केल्यावर आपल्या दुचाकी किंवा चारचाकी वाहनाला पसंती क्रमांक मिळावा, यासाठी वाहनधारक दरवर्षी हजारो लाखो रुपये मोजत पसंती नंबर मिळवतात. पसंती क्रमांकच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन कार्यालयात दरवर्षी कोट्यवधी रुपये महसूल जमा होतो. यावर्षी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत पसंती क्रमांकाच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन कार्यालयाला तब्बल 5 कोटी 65 लाख 94 हजार 500 रुपयांचा महसूल मिळाला आहे.

शुल्क अर्जदार संख्या -पसंती क्रमांकासाठी या आर्थिक वर्षात 7 हजार 177 अर्ज प्राप्त चालेल. एकाच क्रमांकासाठी जास्त अर्ज आल्यास बंद पाकिटात डीडी मागून त्याचा लिलाव केला जातो. ज्याची रक्कम जास्त त्याला तो क्रमांक दिला जातो.

नंबरवरू नावाचे डिझाइन -आता वाहन क्रमांकवरून नावाचे नंबर बनवण्याचा प्रश्न येत नाही. हाय सिक्‍युरिटी नंबर प्लेट असल्याने नंबर प्लेट शोरूम देते, वाहनचालक बाहेर परस्पर नावाचे नंबर बनवतात, असे वाहनचालक आढळून आल्यास प्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई केली जाते.

कोट्यावधी रुपयांचा महसूल -नागरिकांचा वाहन खरेदी कडे वेग वाढला आहे. पसंती क्रमांकाच्या माध्यमातून या वर्षी शासनाला कोट्यवधी रुपये महसूल मिळाला. पूर्वी क्रमांकाच्या माध्यमातून नावे तयार केली जायची. आता हा प्रकार कमी झाल्याचं प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी सांगितले.

व्हीआयपी नंबरसाठी पैसे -

  • नंबर 0001 दुचाकीसाठी 50 हजार, चारचाकी साठी 3 लाख
  • नंबर -0009,0099,0786,0999,9999 दुचाकी साठी 20 हजार, चारचाकी साठी 1 लाख 50 हजार
  • नंबर-0111,0222,0333,0444,0555,0666,0777,0888,3333,2222,5555,6666,7777, 8888 दुचाकी साठी 15 हजार, चार चाकी साठी 70 हजार रुपये

हेही वाचा -Rana VS Shivsena : मातोश्रीवर उद्या 9 वाजता हनुमान चालीसाचे पठण करणारच; रवी राणांचा निर्धार

ABOUT THE AUTHOR

...view details