महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक :- कोकणगावी तिहेरी अपघातात युवती ठार तर अन्य चार जण गंभीर जखमी - नाशिक अपघात

पिंपळगाव परिसरातील मुंबई -आग्रा महामार्गावर कोकणगाव फाटा येथे नादुरुस्त ट्रकमुळे बस आणि कारचा तिहेरी अपघात झाला. या भीषण अपघातात चार अपघात आणि एका युवतीचा मृत्यू झाला.

nashik road accident

By

Published : Mar 19, 2021, 1:11 PM IST

nashik road accident

नाशिक - पिंपळगाव परिसरातील मुंबई -आग्रा महामार्गावर कोकणगाव फाटा येथे नादुरुस्त ट्रकमुळे बस आणि कारचा तिहेरी अपघात झाला. या भीषण अपघातात सटाणा तालुक्यातील बाभूळणा येथील युवती मयुरी पंडित चौरे वय वर्षे १८ हिचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघाताची नोंद पिंपळगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

बसच्या धडकेने कार फेकली गेली खड्ड्यात...
नाशिकहून सटाण्याच्या दिशेने जाणाऱ्या एम.एच.०५ डी.एच. ९३५७ टाटा टॅगो कारचा कोकणगाव येथील शनिमंदिराजवळ नादुरूस्त असलेल्या ट्रकचा कार चालकाला अंदाज न आल्याने त्याने ट्रकला भरधाव वेगाने जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार चालकाचे नियंत्रण सुटले. आणि ती दुसऱ्या लेनला गेली असता मागून येणाऱ्या चाळीसगाव डेपोच्या एम.एच .२०.बी.एल २४१० बसने कारला जोरदार धडक दिली. आणि कार महामार्गाच्या कडेला असलेल्या खड्ड्यात फेकली गेली. तेथे मुंबईत कार्यरत असलेले आणि सटाणा तालुक्यातील बाभूळणा येथील रहिवासी पोलीस हवालदार पंडित बाबुराव चौरे वय वर्षे ४७,पत्नी वैशाली पंडित चौरे वय वर्षे ३९,मुलगा सागर पंडित चौरे २२,वय चालक संजय बागुल वय वर्षे ४२ हे गंभीर जखमी झाले. मात्र, मुलगी मयुरी पंडित चौरे वय वर्षे १८ हिचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.


नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात केले दाखल....
अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तीन वाहनांच्या अपघाताची नोंद पिंपळगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.पुढील तपास भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे.

हेही वाचा - प्रजासत्ताकदिनी कोकणकड्यावर फडकला सर्वात मोठा तिरंगा

टोल नाका प्रशासनाचा हलगर्जीपणा.....
महामार्गावर अपघात घडणारे किंवा वाहन नादुरुस्त झाल्यास,त्या ठिकाणी तात्काळ टोल प्रशासन सेवा पुरवते.नादुरुस्त वाहनाच्या आजूबाजूला बॅरिकेड लावणे, तसेच ते वाहन महामार्गाच्या मधोमध असल्यास हटवून रस्त्याच्या कडेला करणे, ही कामे टोल प्रशासन करते.मात्र, टोलनाक्यापासून अवध्या पाचशे मीटर अंतरावर ट्रक नादुरुस्त झाला तरीही, टोलनाका प्रशासनाने वेळीच मदत न पोहोचल्याने अपघातात मयुरी पंडित चौरे हीचा निष्पाप बळी गेला आहे.

हेही वाचा - फडणविसांनी गृहमंत्र्यांची घेतलेली भेट रूटीन, वाझे प्रकरणावर चर्चा नाही

ABOUT THE AUTHOR

...view details