महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घंटागाडीत कचरा देण्यासाठी येणारे 80 टक्के नाशिककर मास्क वापरत नाहीत! - Nashik Rising Corona Infection News

जिल्ह्यासह नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून एकट्या नाशिकमध्ये 48 हजार कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी 700 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच रोज 600 ते 700 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. मात्र, अनलॉकनंतर नाशिककर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असून अनेक ठिकणी शासन नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे.

नाशिक कोरोना लेटेस्ट न्यूज
नाशिक कोरोना लेटेस्ट न्यूज

By

Published : Sep 27, 2020, 1:00 PM IST

Updated : Sep 27, 2020, 4:20 PM IST

नाशिक -नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे मात्र नागरिकांन कडून सर्रास शासन नियमाचे उल्लंघन होत आहे. अनेक नागरिक विनामास्क रस्त्यावर फिरताना दिसतात. अशात सकाळच्या सुमारास घंटागाडीत कचरा टाकताना 80 टक्के नाशिककर मास्क वापरत नाहीत, असे ईटीव्ही भारतच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.

80 टक्के नाशिककर मास्क वापरत नाहीत
जिल्ह्यासह नाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून एकट्या नाशिकमध्ये 48 हजार कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यापैकी 700 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच रोज 600 ते 700 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. मात्र, अनलॉकनंतर नाशिककर मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असून अनेक ठिकणी शासन नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक शहरात कचरा संकलित करण्यासाठी शहरातील प्रत्येक प्रभागात घंटागाडी जाऊन कचऱ्याचे संकलन करत असते. अशा वेळी 80 टक्के नागरिक घंटागाडीत कचरा देण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आले.मास्क वापरत का नाही याची नागरिकांनी दिलेली कारणे1) घंटागाडीचा आवाज आला म्हणून पळत कचरा देण्यासाठी आलो आणि मास्क घरात विसरलो.2) घरातून थोडे अंतर बाहेर पडताना मास्क वापरणे गरजेचे वाटत नाही.3) मास्क घरात सापडला नाही म्हणून कचरा देण्यासाठी तसाच आलो.कचरा देताना मास्क वापरणे का गरजेचे?नाशिक शहरातील कोरोनाबधितांचा आकडा 48 हजारपर्यंत जाऊन पोहोचला आहे. 43 हजार जण कोरोनामुक्तही झाले आहेत. मात्र, शेकडो रुग्ण अजूनही शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असून अनेक रुग्ण घरातच विलगीकरणात आहेत. अशात गृह विलगीकरणात असणारे रुग्ण वापरलेले मास्क, सॅनिटायझरच्या रिकाम्या बाटल्या घंटागाडीत देत असतात. काही रुग्ण शासन नियमानुसार हा कचरा वेगळ्या पिशवीत टाकून त्याची माहिती घंटागाडी कर्मचाऱ्यांना देतात. मात्र, काही जण इतर कचऱ्यात हा कचरा देत असल्याचे निदर्शनास आले आहे.पोलिसांकडून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईनाशिक शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी एप्रिल 2020 पासून घराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. आतापर्यंत ह्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 20 हजार नागरिकांवर पोलिसांनी कलम 188 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
Last Updated : Sep 27, 2020, 4:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details