नाशिक - शहरातील अत्यंत दाटीवाटीच्या असलेल्या परिसरात कोरोनाने शिरकाव केल्याने नाशिक मनपा आणि आरोग्य प्रशासन हादरून गेले आहे. शनिवारी दिवसभरात नाशिक जिल्ह्यात 34 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 936 वर जाऊन पोहोचला आहे. एकट्या नाशिक शहरात 76 रुग्ण आहेत.
जुने नाशिक परिसरातील कुंभार वाडा येथे याआधी एक महिला रुग्ण आढळली होती. यानंतर नाईकवाडा पुरा आणि मोठा राजवाडा परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने सपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. तसेच नाशिक शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या वडाळा येथे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. या परिसरातील नागरिकांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनीही जुन्या नाशिक परिसरात पाहणीदौरा करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. जुन्या नाशकात कोरोनाने शिरकाव केल्यानं प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
शनिवारी दिवसभरात नाशिक शहरासह ग्रामीण भागात एकूण 34 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत.
आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 47 (नाशिक शहर - 4)
- जिल्ह्यात एकूण करोनाबाधित - 936 ( बरे झालेले - 673 )
- नाशिक शहर - 76 ( बरे झालेले - 39 )
- नाशिक ग्रामीण - 125 ( बरे झालेले - 86)
- मालेगाव - 696 ( बरे झालेले - 511)
- एकूण प्रलंबित अहवाल - 245
- दुसर्या जिल्ह्यांतील रुग्ण जे नाशिक जिल्ह्यात उपचार घेत आहे - 39
नाशिक शहरात एकूण प्रतिबंधित क्षेत्र -17
1) सिन्नर फाटा, 2) काठे गल्ली, 3) नवश्या गणपती, आनंदवल्ली, नाशिक, 4) पंडित नगर, सिडको, नाशिक, 5) सिद्धेश्वर नगर, नाशिकरोड, 6) गोसावी वाडी, नाशिकरोड 7) मोठा कुंभारवाडा, नाशिक, 8) अमेय अपार्टमेंट, नाशिकरोड, 9) वडाळा गाव नाशिक, 10) प्रभात वसाहत, संजीव नगर, 11) मोठा राजवाडा, नाशिक, 12) शिवाजी वाडी, भारत नगर, 13) नाईकवाडी पुरा वडाळा नाका, 14) मुमताज नगर, वडाळा, 15) लेखा नगर, सिडको, 16) शनी मंदिर, दिंडोरी रोड, 17) प्रभात कॉलनी, रत्नप्रभा चौक ही ठिकाणे प्रतिबंधित घोषित केली आहेत.