नाशिक - शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी 'अॅक्शन प्लॅन'ची आखणी केली आहे. या प्लॅननुसार शहरातील कानाकोपरा 'क्यूआर कोड'ने सुरक्षित करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून शहरात चोऱ्या, घरफोड्या, चेन स्नाचिंग, दरोडा, गोळीबार ह्यासारख्या गुन्ह्यांमुळे शहरातील नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली. यामुळे नागरीकांनी थेट पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्हे उपस्थित करण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी गुन्हेगारीवर आळा घालण्याची स्पेशल अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. ह्याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी 5 अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत तडीपारची कारवाई करण्यात आली. शहरातील काही सराईत गुन्हेगारही पोलिसांच्या रडारवर असल्याचे आयुक्तांनी सांगितले.