नाशिक - कोरोनाचा धोका अद्यापही नाशिक जिल्ह्यात कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. अनेक नागरिक विकेंडला घराबाहेर पडत पर्यटन स्थळांवर गर्दी करत आहेत. हे बघता कडक कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिला आहे. अत्यावश्यक काम वगळता विनाकारण गर्दी कराल तर थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
विकेंडला घराबाहेर पडताय, सावधान! नाशिक पोलीस अॅक्शन मोडवर - Superintendent of Police Sachin Patil
कोरोनाचा धोका अद्यापही नाशिक जिल्ह्यात कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. अनेक नागरिक विकेंडला घराबाहेर पडत पर्यटन स्थळांवर गर्दी करत आहेत. हे बघता कडक कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिला आहे. अत्यावश्यक काम वगळता विनाकारण गर्दी कराल तर थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
वाहन देखील होणार जप्त -
नाशिक जिल्ह्यामध्ये पाचपेक्षा अधिक नागरिक एकत्र राहिले तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिला आहे. जिल्ह्यामध्ये यापुढे पाचपेक्षा अधिक नागरिक एका ठिकाणी एकत्रित दिसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल. कोरोनाची संभाव्य लाट थांबविणे हे प्रशासनाचे प्रथम कर्तव्य आहे. त्या दृष्टिकोनातून तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. नाशिक जिल्हा हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्यासाठी येणाऱ्या नागरिकांवर शनिवार-रविवारी तातडीने कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहे. कोरोना महामारी करता जे नियम निश्चित करून देण्यात आले आहे. त्याचे जिल्ह्यामध्ये उल्लंघन झाले तर आता यापुढे दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच संबंधित नागरिकांचे वाहन देखील जप्त करण्यात येईल. संध्याकाळी चार वाजेनंतर कोणीही बाहेर पडणार नाही, याची काळजी घेतली जाईल आणि यापुढे जिल्ह्यामध्ये चार वाजेनंतर फिरणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.