महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निराधारांचे आधार बनले नाशिक पोलीस

सध्या लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये निराधारांचे हाल होत आहेत. त्यांच्या मदतीसाठी विविध सामाजिक संघटना धावत असून यामध्ये पोलीसही मागे नाहीत.

निराधार आधार
निराधार आधार

By

Published : Mar 31, 2020, 10:53 AM IST

Updated : Mar 31, 2020, 12:25 PM IST

नाशिक- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे निराधारांचे मोठे हाल होत होते. ही बाब पोलिसांच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी पोलीस धावून गेले. त्यांच्या राहण्याची व खाण्याची सोय पोलिसांसह विविध सामाजिक संस्थांनी मिळून केला आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात पोलीस अहोरात्र काम करताय. त्याच काळात घराबाहेर पडणाऱ्यांना पोलीस चांगलाच लाठीचा प्रसाद ही देताय. त्यामुळे काही ठिकाणी स्वागत तर काही ठिकाणी पोलिसांना टीकेचे धनी व्हावं लागतंय. मात्र नाशिकमध्ये खाकीच्या आड असलेल्या माणुसकीचं दर्शन झालंय. कोरोनामुळे नाशिकच्या निराधारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती. निवाऱ्यापासून ते पोटाची खळगी भरण्याची मोठी चिंता त्यांच्यासमोर उभी राहिली होती. मात्र, याच काळात पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत हे धावून आले. नगरपालिकेच्या माध्यमातून राहण्याची व्यवस्था करत सामाजिक संस्थांची मदत घेत निराधारांचाचा गंभीर प्रश्न या संकट काळात निकाली काढला आहे.

हेही वाचा -नाशिकमधील विद्यार्थ्यांनी बाजारातील गर्दी टाळण्यासाठी तयार केले कृषी बास्केट अ‌ॅप

Last Updated : Mar 31, 2020, 12:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details