नाशिक- राज्यात रक्ताचा पुरवठा कमी पडू नये यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान करण्याचे नागरिकांना आवाहन केले आहे. त्यामुळे, बऱ्याच ठिकाणाहून रक्तदान शिबीरांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशात आता नाशिक मध्यवर्ती कारागृहातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकी जपत कारागृहात रक्तदान केले आहे.
सामाजिक बांधिलकी, नाशकात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान - महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या अनुषंगाने राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांनी पुढील काळात रक्ताचा तुटवडा होऊ नये, याकरता नागरिकांना रक्तदानाचे आवाहन केले होते.अशात आता नाशिक मध्यवर्ती कारागृहातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकी जपत कारागृहात रक्तदान केले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या अनुषंगाने राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांनी पुढील काळात रक्ताचा तुटवडा होऊ नये, याकरता नागरिकांना रक्तदानाचे आवाहन केले होते.
या आवाहानाला प्रतिसाद देत कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान केले. शासकीय परवानगी घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासत 150 व्यक्तींनी नाशिक जिल्हा रुग्णालयाला रक्त दिले असल्याची माहिती नाशिक कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली.