नाशिक -सर्वत्र उत्साहात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येत आहे. अनेक ठिकाणी ठोल ताशांच्या गरजात बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. नाशिकमध्येही देखील बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली असून, शहर वाहतूक पोलिसांनी नाशिक ढोलच्या तालावर ठेका धरला.
गणपती विसर्जन मिरवणूक: नाशिक ढोलच्या तालावर वाहतूक पोलिसांनी धरला ठेका - dhol tasha
सर्वत्र उत्साहात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येत आहे. अनेक ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. यावेळी शहर वाहतूक पोलिसांनी नाशिक ढोलच्या तालावर ठेका धरला.
नाशिक ढोलच्या तालावर पोलिसांनी धरला ठेका
संपूर्ण राज्यात गणपती उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जात आहे. नाशिकच्या वाहतूक पोलिसांनीही गणपतीची स्थापना केली होती. आज अनंत चतुर्थीला पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागत असल्याने पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी ढोल पथकावर ठेका धरत सकाळी लवकर गणरायाला निरोप दिला. गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर... या अशा घोषणाही पोलिसांनी दिल्या. ढोल ताशावर ठेका धरणाऱ्या पोलीस महिलांनी नृत्याचा सर्वाधिक आनंद लुटला.