नाशिक - महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी नाशिक पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी नाशिक पोलिसांनी निर्भया पथकाची स्थापना केली आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांची होणारी छेडछाड रोखण्यासाठी निर्भय पथकाची स्थापना करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.
नाशिकच्या महिला होणार 'निर्भय'; पोलिसांचे निर्भया पथक कार्यान्वित - पोलीस आयुक्त
महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी नाशिक पोलिसांनी निर्भया पथकाची स्थापना केली आहे. सार्वजनिक ठिकाणी महिलांची होणारी छेडछाड रोखण्यासाठी निर्भय पथकाची स्थापना करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.
शहरात १० निर्भय पथक रहाणार असून एका पथकात एक महिला पोलीस अधिकारी आणि ४ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. यासाठी शहरातील ५०० ठिकाणं निवडून त्या ठिकाणी या पथकांची नजर राहणार आहे. महिलांची छेडछाड करणे, पाठलाग करणे, गैरवर्तन करणे, अश्लील भाव करत महिलांना त्रास देणे, अशा प्रकारच्या घटनांवर हे पथक लक्ष ठेवून असणार आहे. नाशिक शहरातील शाळा, महाविद्यालय, चित्रपट गृह, गार्डन, बसस्टँड, रेल्वे स्टेशन, अशा सार्वजनिक ठिकाणी हे पथक कार्यान्वित राहणार आहेत. या पथकाकडे हिडन कॅमेरा, मोबाइल कॅमेरा असणार आहे.
पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत निर्भया पथक कार्यान्वित करण्यात आले. यावेळी नाशिक शहरातील पोलीस अधिकारी व विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. यावेळी निर्भया पथकामुळे माहिलांच्या छेडछाडीवर आळा बसेल, असा विश्वास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.