महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशकातील गुन्ह्यांचा छडा लावणाऱ्या पोलिसांचा आयुक्त नांगरे पाटलांनी केला सत्कार - Police Commissioner Vishwas Nangare Patil felicitates the officers

वाहन चोरी, चेन स्नॅचिंग, मुलींचे अपहरण, चंदन चोरी, अशा विविध गुन्ह्यांचा तपास करण्यात शहर पोलिसांना मोठे यश आले आहे. आठवड्याभरात शहर पोलिसांकडून वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास करण्यात आला होता. यात पोलिसांनी १९ लाख ६ हजार रुपयांच्या मुद्देमालासह डझन भर आरोपींना गजाआड केले आहे.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अधिकाऱ्यांचे सत्कार करून केले कौतूक

By

Published : Aug 17, 2019, 9:22 PM IST

नाशिक - सराईत चंदन चोरांची टोळी जेरबंद करण्यासह अनेक गुन्ह्यांचा छडा शहर पोलिसांनी लावला आहे. या कार्यात काही पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी विशेष कामगिरी केली होती. या पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचा सत्कार करून पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी कौतूक केले आहे.

आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अधिकाऱ्यांचा केला सत्कार

वाहन चोरी, चेन स्नॅचिंग, मुलींचे अपहरण, चंदन चोरी, अशा विविध गुन्ह्यांचा तपास करण्यात शहर पोलिसांना मोठे यश आले आहे. आठवडाभरात शहर पोलिसांकडून वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास करण्यात आला होता. यात पोलिसांनी १९ लाख ६ हजार रुपयांच्या मुद्देमालासह डझन भर आरोपींना गजाआड केले आहे. शहर पोलिसांनी सात मोठ्या कारवाया केल्या होत्या. यात चंदन चोरी आणि वाहन चोरी करणाऱ्या मोठ्या टोळीस जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांकडून शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घातल्यानंतर त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

शहरातील शासकीय कार्यालयातील चंदनाच्या झाडांची सुद्धा व्हायची चोरी

शहरातील महाराष्ट्र पोलीस अकादमी, जिल्हाधिकारी यांचे निवास स्थान, पोलीस अधीक्षक यांचा बंगला या सह शहरातील शासकीय कार्यालयातील चंदनाच्या झाडांची चोरी होत होती. ही चोरी करणाऱ्या टोळीला नाशिकच्या गुन्हे शोध पथक आणि सातपूर पोलीस ठाण्यातील पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत संजय जाधव, अनिल जाधव, शिवाजी जाधव, उत्तम जाधव या संशयित आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. तसेच त्यांच्याकडून ३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details