महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या दोन चोरट्यांना नाशिक पोलिसांनी केले जेरबंद

दोघेही चोर नाशिक-पुणे महामार्ग ओलांडून नाशिक रोडच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षात बसले. बीट मार्शल चंद्रमोरे आणि महाजन यांनी रिक्षाचा पाठलाग केला. काही अंतरावर रिक्षा थांबवून उतरल्यानंतर चोरटे पळू लागले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांनी चोरट्यांना उपनगर पोलीस ठाण्यात आणले.

nashik
दागीने चोरणाऱ्या चोरट्यांचे दृश्य

By

Published : Feb 13, 2020, 3:07 PM IST

नाशिक- शहरातील जेलरोडवर एका महिलेचे सोन्याचे दागिने हिसकावून दोन दुचाकीस्वारचोरटे फरार झाले होते. या दोघा चोरट्यांना उपनगरच्या गस्तीवरील दोन सतर्क बीट मार्शल पोलिसांनी नाशिकरोड येथे चित्तथरारक पाठलाग करून अटक केली आहे.

जेलरोडच्या दसक बस थांब्याजवळील लक्ष्मीवैभव सोसायटीत लक्ष्मीबाई सुरेश मेदगे (वय.५४) राहत असून त्या सैलानीबाबा मंदिराजवळून पायी घरी येत होत्या. त्या दरम्यान दुचाकीवरील दोन चोरट्यांनी मेदगे यांचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हिसकावले. मेदगे यांची आरडाओरड ऐकून नागरिकांनी त्यांच्याकडे धाव घेतली. मात्र, चोरटे पसार झाले होते. याबाबत नागरिकांनी पोलिसांना कळवताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही रेकॉर्डिंग व फोटो घेऊन पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व पोलिसांच्या व्हॉट्सअ‌ॅप ग्रुपवर पाठवले. त्यामुळे शहरातील बीट मार्शल, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी चोरट्यांबाबत सावध झाले.

उपनगर पोलीस ठाण्याचे बीटमार्शल पोलीस नाईक समीर चंद्रमोरे आणि दिनेश महाजन हे जयभवानी रोडवर दुचाकीने गस्त घालत होते. त्यांना निसर्गोपचार केंद्रामागील महापालिका उद्यानाजवळ सोनसाखळी चोरीशी साधर्म्य असलेली दुचाकी आढळली. पोलीस पोहोचताच तिथे जवळच बसलेले दोन चोर पळू लागले. चंद्रमोरे आणि महाजन यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. दोघेही चोर नाशिक-पुणे महामार्ग ओलांडून नाशिकरोडच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षात बसले. बीट मार्शल चंद्रमोरे आणि महाजन यांनी रिक्षाचा पाठलाग केला. काही अंतरावर रिक्षा थांबवून उतरल्यानंतर चोरटे पळू लागले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांनी चोरट्यांना उपनगर पोलीस ठाण्यात आणले.

हेही वाचा-खळबळजनक! क्षुल्लक वादातून सासूचा खून, २४ तासात घटनेची उकल-

ABOUT THE AUTHOR

...view details