नाशिक - एटीएम चोरी करणाऱ्या चोरांचा गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकाने सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करत अटक केली. नाशिक शहरातील सातपूर परिसरात ही घटना घडली. नाशिक पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे.
मागील काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात एटीएम चोरीच्या धाडसी घटना घडत आहेत. मंगळवारी पुन्हा असाच एक एटीएम चोरीचा थरार नाशिकमध्ये घडला. सातपूरच्या पपया नर्सरी परिसरात असलेल्या आयसीआयसीआय बँकेचे एटीएम सहा जणांच्या टोळीने यशस्वीपणे उचलेले. मात्र, हे एटीएम मशीन वाहनात टाकत असताना गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर चोरांनी एटीएम सोडून पळ काढला.