नाशिक - उत्तर महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या सोनसाखळी चोरांच्या टोळीला नाशिक पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून २५ गुन्ह्यांची कबुली देण्यात आली आहे. या टोळीतील काही आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सोनसाखळी चोरांच्या टोळीला नाशिक पोलिसांनी केले गजाआड - नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील
उत्तर महाराष्ट्रात धुमाकूळ घालणाऱ्या सोनसाखळी चोरांच्या टोळीला नाशिक पोलिसांनी गजाआड केले. आरोपींकडून दहा लाखांपेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
विश्वास नांगरे-पाटील, पोलीस आयुक्त नाशिक
हेही वाचा - अतिवृष्टीमुळे कांदा उत्पादन घटले; देशभरात भाव वाढणार?
आरोपींकडून दहा लाखांपेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या टोळीने सोने-चांदीच्या वस्तूंच्या चोऱ्या केलेल्या आहेत. या आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली.