महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिकमध्ये गोळीबार करून लुटणारी टोळी ताब्यात; शहर पोलिसांची मोठी कारवाई - gun

शहरात ३ ते ४ वर्षापासून सराईत गुन्हेगारांची टोळी गुन्हे करत होती, या टोळीचा अनेक वेळा शोध घेण्याचा प्रयत्न झाला मात्र पोलिसांना यश आले नव्हते, अखेर या ६ सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एअरगन फायर आणि जबरी लुटीच्या गुन्ह्यात अटक केली. त्यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

नाशिकमध्ये गोळीबार करून लुटणारी टोळी ताब्यात

By

Published : Apr 3, 2019, 1:40 PM IST

नाशिक - एअरगनद्वारे हवेत गोळीबार करून कुलकर्णी कॉलनीतील गजानन स्मृती अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये व्यापाऱ्याला धाक दाखवून हवेत गोळी झाडून तीन लाखाची लूट करणाऱ्या टोळीचा शहर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. या गुन्ह्याचा कट रचणे पासून प्रत्यक्ष कृती करणे यामध्ये ६ सराईत गुन्हेगार सहभागी होते असे तपासात निष्पन्न झाले असून त्यांच्यावर मोक्का अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त विश्वास नांगरे -पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिकमध्ये गोळीबार करून लुटणारी टोळी ताब्यात


शहरात ३ ते ४ वर्षापासून सराईत गुन्हेगारांची टोळी गुन्हे करत होती, या टोळीचा अनेक वेळा शोध घेण्याचा प्रयत्न झाला मात्र पोलिसांना यश आले नव्हते, अखेर या ६ सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एअरगन फायर आणि जबरी लुटीच्या गुन्ह्यात अटक केली. त्यांच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहेत.


युनिट दोनच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून राणेनगर येथून मुख्य संशयित योगेश घनश्याम बसते (वय २६ रा. राणेनगर) येथून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदार विजय देविदास धनगर (वय २१ रा. कामटवाडा सिडको) प्रवीण प्रकाश किरवे (वय २५ रा. जेलरोड) तुषार भास्कर मगर (वय २० रा. उपेंद्र नगर) यांचा पत्ता सांगितला. तेव्हा पोलिसांनी त्याच्या साथीदारांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली, मात्र या घटनेत असे समोर आले की यातील दोन इसम हे पाळत ठेवण्याचे काम करतात आणि तीन इसम जबरी लूट करून पसार होतात याची सखोल चौकशी केली असता या टोळीकडून नाशिक शहर आणि बाहेरील पाच गंभीर गुन्हे उघड झाले आहे. या गुन्ह्यात वापरलेले ६ मोबाइल एअर पिस्तोल ४ मोटर सायकल आणि काही मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खून बलात्कार तडीपार सामूहीक अत्याचार असे गंभीर गुन्हे या टोळीतील आरोपींवर दाखल आहेत तरीही गेल्या चार वर्षांपासून शहरात सक्रिय होती. यासोबत लूटमार करताना पाळत ठेवणारे त्यांचे दोन साथीदार हरीश व्यंकट पटेल (वय २९) निलेश पोपट शिंगाडे (वय २९ रा. वडारवाडी दिडोरी रोड) यांनी गुन्ह्यात सहभाग घेतल्याचे सांगितले. पथकाने तत्काळ या दोघांनाही अटक केली. शहरातील अशा वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details