नाशिक - जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पोलीस प्रशासन २१ तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. जिल्ह्यात एकूण १५ मतदारसंघ असून ४ हजार ५७९ मतदान केंद्र आहेत. त्यामुळे तब्बल १ हजार ३२५ पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.
नाशकात निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज, तेराशे पोलीस असणार तैनात - नाशिक पोलीस प्रशासन
विधानसभा निवडणूक काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी नाशिक पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. मतदानाच्या दिवशी पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. जिल्ह्यात 32 आचारसंहिता भंगाच्या तक्रारी दाखल असून २५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच १६ लाख किमतीची दारू पकडण्यात आली आहे. इतर काही माहितीसाठी १९५० हा टोलफ्री क्रमांक जारी करण्यात आला आहे. रूट मार्च कोंबिंग ऑपरेशन, अशा मोहीम सुरू आहे. ४५० गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली. शहरात ३३ संवेदनशील स्पॉट निश्चित करण्यात आले असून पोलीस निवडणूक काळात सज्ज असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.