नाशिक - जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दुसरीकडे मात्र नाशिककरांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. नाशिक पोलिसांनी नागरिकांना शिस्त लावण्यासाठी मोहीम हाती घेतली असून गेल्या सहा महिन्यात विना मास्क रस्त्यावर फिरणाऱ्या 19 हजार जणांवर कलम 188 अंतर्गत कारवाई केली.
नाशकात विना मास्क फिरणाऱ्या 19 हजार जणांवर पोलिसांची कारवाई - nashik police action on without mask citizen news
नाशिकमध्ये नागरिक कुठल्याचं प्रकराचं सोशल डिस्टनसिंग आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापर करत नाही. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. नाशिक पोलिसांनी देखील विना मास्क रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांविरोधात धडक मोहीम उघडली आहे. मागील सहा महिण्यात पोलिसांनी 19 हजार 728 जणांवर भारतीय दंड विधान 188 अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे.
सोशल डिस्टनसिंगचे पालन आणि विना मास्क फिरणाऱ्याव कठोर कारवाई - छगन भुजबळ
नाशिकमध्ये नागरिक कुठल्याचं प्रकराचं सोशल डिस्टनसिंग आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापर करत नाही. याबाबत कोरोना आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, ही बाब गंभीर असल्याचे म्हणत सोशल डिस्टनसिंगचे पालन आणि विना मास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. ज्या दुकानात सोशल डिस्टनसिंगचे पालन होत नाही, अशा दुकानांना पहिल्यांदा सूचना देण्यात याव्या. मात्र, तरी सुद्धा परिस्थिती सुधारली नाही तर दुकाने बंद करण्याची कारवाई करावी करण्यात यावी, असे ही भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.