नाशिक- शहरात आता लवकरच ई-चलानद्वारे दंडवसुली केली जाणार आहे. यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून कंट्रोल रूममधील ८० स्क्रीन आणि ८०० कॅमरे बेशिस्त चालकांवर नजर ठेवणार आहेत. याशिवाय या प्रणालीमुळे वाहतूक पोलिसांना मोठा दिलासा मिळणार असून 'चिरीमिरी' आणि वादाचे प्रमाण शून्यावर येण्यास मदत होणार आहे.
नाशिक शहरात आता स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून पोलीस ई-चलनाद्वारे दंडवसुली करणार आहे. त्यासाठी शहरात ८०० कॅमरे बसविले जाणार असून यासाठी प्रशस्त कंट्रोल रूम उभा केला जाणार आहे. त्यात अद्यावत यंत्रणेची माहिती असणारे २०० कर्मचारी काम करणार आहे.
सीसीटीव्ही यंत्रणेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीत मोठा बदल होणार आहे. अद्यावत कॅमेरे असल्याने वाहनांची प्रत्येक हालचाल टिपण्यासाठी देखील मदत होणार आहे. तर सिग्नल यंत्रणा देखील सिंक्रोनाईज केली जाणार आहे. इतकेच काय तर चैन स्नॅचिंग, महिलांची छेड, टवाळखोर यांच्यासह घडणाऱ्या प्रत्येक घटनेची नोंद कॅमेऱ्यात रेकॉर्ड होणार आहे.