नाशिक -जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून विशाखापट्टणम येथून नाशिक जिल्ह्याला 2 टँकर मिळाले आहेत. यात 30 मेट्रिक टन ऑक्सिजन असून नाशिक जिल्ह्याला रोज 103 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून मिळालेला साठा हा जिल्ह्याला अर्धा दिवस पुरेल एवढाच आहे.
हेही वाचा -'केंद्र सरकारच्या पाया पडण्यापेक्षा राज्य सरकारने नियोजन करणे गरजेचे'
नाशिक मध्ये कोरोनाचा उद्रेक सुरू असून, कोरोनाबधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. रोज 5 ते 6 हजार नवीन कोरोनाबाधितांची भर पडत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 45 हजारांच्या जवळपास कोरोनाबाधित उपचार घेत असून यामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयातील बेड देखील फुल्ल झाले आहेत. ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवत आहे. आणि हाच तुटवडा भरून काढण्यासाठी विशाखापट्टणम येथून नाशिक जिल्ह्याला 2 टँकर मिळाले आहेत. यात 30 मेट्रिक टन ऑक्सिजन आहे. नाशिक जिल्ह्याला रोज 103 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून 85 टन ऑक्सिजन रोज लागतो. मात्र, मिळालेला साठा हा नाशिक जिल्ह्याला अर्धा दिवस पुरेल एवढाच असून ऑक्सिजन तुट भरून काढण्यासाठी इतर राज्यातून देखील ऑक्सिजन आणण्याची गरज आहे.