महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस आयुक्तांनी 250 गुन्हेगारांना दिली पुन्हा सुधारण्याची संधी; पाच महिन्यात मोक्काअंतर्गत रेकॉर्ड कामगिरी - Police Commissioner Deepak Pandey

गुन्हेगारांना सुधारण्यासह समाजात चांगले नागरिक म्हणून वावरावे. यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या संकल्पनेतून गुन्हेगार सुधार योजनेतून 250 गुन्हेगारांची सुटका करण्यात आली आहे. तर नाशिक शहर मागील पाच महिन्यात मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करून 108 आरोपींना जेलबंद केले. आणि मागील दहा वर्षाचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे.

Nashik: Opportunity to rehabilitate 250 criminals
नाशिक - 250 गुन्हेगारांना पुन्हा सुधारण्याची संधी

By

Published : Jul 1, 2021, 7:53 AM IST

नाशिक - पोलीस आयुक्तालयाच्या वतीने 250 गुन्हेगारांना पुन्हा सुधारण्याची संधी दिली आहे. तर गेल्या पाच महिन्यांत 108 जणांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. आणि मागील दहा वर्षाचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे.

शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी गुन्हेगार सुधार योजना -

गुन्हेगारांना सुधारण्यासह समाजात चांगले नागरिक म्हणून वावरावे. यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या संकल्पनेतून गुन्हेगार सुधार योजनेचे आयोजन करण्यात आले. राज्यामध्ये प्रथमच गुन्हेगारांना सुधारण्यासाठी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून शहरातील गुन्हेगारीकरण कमी करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. ही मोहीम राज्यामध्ये एक आदर्श ठरू पाहत आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच या मोहिमेला देखील नाशिक शहरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मोक्काअंतर्गत 108 जणांवर कारवाई करून मोडले 10 वर्षाचे रेकॉर्ड -

पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या या निर्णयाचे गुन्हेगारी जगतात ही चांगले स्वागत केले आहे. छोट्या-मोठ्या गुन्ह्यांमध्ये चुकुन गुन्हेगारी क्षेत्रात आलेल्या गुन्हेगारांना यापासून पुन्हा एकदा आपल्या आयुष्यामध्ये आणि समाजाच्या मूळ प्रवाहात आणणारी ही योजना चांगली सफल झाली आहे. पोलीस आयुक्तांच्या योजनेमध्ये एकूण 250 जणांना गुन्हेगार सुधार योजनेतून लाभ मिळाला आहे. नाशिक शहर मागील पाच महिन्यात लॅन्ड माफिया, खंडणीखोर, खून करून दहशत निर्माण करणारी टोळी, गँगरेप सारखा गुन्हा करून दहशत निर्माण करणारी संघटीत टोळी कार्यरत होती. अश्या प्रकारच्या गुन्ह्यांना संघटीत टोळ्यांना मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करून 108 आरोपींना जेलबंद केले. आणि मागील दहा वर्षाचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे.

हेही वाचा - नाशिक: त्रिसूत्रीची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर थेट कारवाई; पोलीस आयुक्तांचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details