नाशिक -उन्हाळी कांद्याचा साठा संपुष्ठात आल्याने कांद्याचे दर 7 हजार रुपये प्रती क्विंटलच्या घरात पोहोचले आहेत. या हंगामातील दरवाढीचा हा उच्चांक मानला जात आहे. दरवाढीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आनंदात आहे. तर कांद्याची किरकोळ विक्री 80 रुपये प्रतिकिलोच्या पुढे पोहोचल्याने सामान्य ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
शेतकऱ्यांवर सडका कांदा फेकून द्यायची वेळ हेही वाचा - नुकसानीची रक्कम सरकारलाच मनीऑर्डर करणार, अपुऱ्या मदतीबाबत शेतकऱ्याची उद्विग्न भावना
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची तुरळक आवक पहायला मिळाली. बागलाण तालुक्यातील नामपूर बाजार समितीत 100 वाहनांमध्ये सुमारे 2 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. यात कांद्याला 7 हजार 300 रुपये प्रती क्विंटल असा हंगामातील सर्वोच्च भाव मिळाला. सरासरी भाव 6 हजार 700 रुपये असा तर कमीत कमी 3 हजार रुपये दर होता.
चांदवड, सिन्नर, देवळा, कळवण, पिंपळगाव आदी बाजार समित्यांमध्ये 7 हजार रुपयांच्या पुढे भाव मिळाला. अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. बहुसंख्य कांदा हा कांदा चाळीतच सडला आहे. पर्यायी साठविलेला कांदा संपुष्ठात आल्याने येथील बाजार समितीच्या आवारात कांद्याची दैनंदीन आवक घटली आहे. म्हणून याचा परिणाम कांदा भाव वाढीवर झाला आहे.
हेही वाचा -कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसाचे अपहरण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा दाखल, एक अटकेत