महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंतप्रधान मोदींना पोस्ट कार्डवर लेखी पत्र पाठवणार राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी - पंतप्रधानांना पत्र पाठविण्याची मोहीम

कांदा बाजार भावाची झालेली घसरण थांबवण्यासाठी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट कार्डवर लेखी पत्र पाठवणार आहेत

कांदा
कांदा

By

Published : May 21, 2020, 4:59 PM IST

नाशिक -कांद्याचे सरासरी दर अगदी चार ते पाच रुपये किलो इतक्‍या खाली आल्याने कांदा उत्पादकांना नफा तर दूरच उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून मोठ्या अडचणीत सापडला आहे.

भारत दिघोळे - संस्थापक, कांदा उत्पादक शेतकरी संघटना

कांदा उत्पादकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून सरकारकडून मात्र काही हालचाली दिसत नाहीत. कांदा बाजार भावाची झालेली घसरण थांबवण्यासाठी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट कार्डवर लेखी पत्र पाठवणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली.

राज्यभरातून सुमारे एक लाख लेखी पत्र या मोहिमेसाठी पाठवण्यात येणार असून 22 तारखेपासून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. राज्यातील एक लाख शेतकरी स्वतः हे पत्र लिहून त्या-त्या गावातील टपाल कार्यालयात टाकतील. त्या पत्रात लिहिला जाणारा मजकूर राज्यभरातील शेतकऱ्यांना व्हाट्सअप, फेसबुक मेसेजच्या माध्यमातून दिला जाणार आहे. 22 ते 28 मे या आठ दिवसात ही एक लाख पत्रे पाठवली जाणार असल्याची माहिती कांदा उत्पादक शेतकरी संघटनाच्या संस्थापकानी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details