नाशिक -पुणेरी पलटण आणि नाशिक कबड्डी असोसिएशनच्या वतीने नाशिकमध्ये झालेल्या कबड्डी प्रो स्पर्धेत शिवशक्ती स्पोर्ट क्लब हा संघ विजयी ठरला आहे. अंतिम सामन्यामध्ये नाशिकच्याच शिवशक्ती स्पोर्ट क्लब आडगाव संघाने ब्रम्हा स्पोर्ट्स संघावर १८ विरुद्ध १६ अशी मात करत विजेतेपद पटकावले.
IND VS WI: भारताचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय; मालिकेत 1-0 ने आघाडी
या कबड्डी स्पर्धेमध्ये 24 संघांनी सहभाग नोंदविला होता. एकूण 288 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ग्रामीण भागातील खेळाडूंना अद्यावत साधने व योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी नाशिकमध्ये हे कबड्डी सामने सुरू केले असल्याचे क्रीडाशिक्षक प्रशांत भाबड यांनी सांगितले आहे.