नांदगाव (नाशिक) - राखीपोर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या अतूट नात्याचा सण म्हणून गणला जातो. आजच्या दिवशी बहीण कुठेही असली तरी आपल्या भावाला ओवाळण्यासाठी जाते. मात्र, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यापासून आपल्या जीवाची पर्वा न करता अत्यावश्यक सेवा बजावणारे पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी यांच्यासह इतर सेवा देणाऱ्यांना युवती काँग्रेसतर्फे राखी बांधून एक आगळावेगळा रक्षाबंधनाचा कार्यक्रम करण्यात आला.
युवती काँग्रेसकडून कोरोना योध्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे - nashik nandgav rakhi pournima news
हा सण आत्यावश्क सेवा देणाऱ्या सर्वासोबत साजरा करुन त्यांना ते करत असलेल्या कार्याचा सलाम आणि कौतुक म्हणून हा सण महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या युवती सेलच्या वतीने साजरा करत असल्याचे मत युवती काँग्रेसच्या कल्याणी रांगोळे यांनी व्यक्त केले.
राखीपोर्णिमा भाऊ-बहिणीचा सण पण सध्याच्या या कोरोनाच्या महामारी आणि लॉकडाउनमुळे सर्वच सण उत्सव साधेपणाने साजरे केले जात आहे. पण खऱ्या अर्थाने राखी पौर्णिमेचा सण हा या कोरोनाच्या काळात साजरा करण्यासारखा आहे. कोरोना काळात हे सर्व आत्यावश्क सेवा देणारे आपल्यासाठी सेवा पुरवणारे सर्व कोरोना योद्धा हे सन्मानास पात्र आहेत. परंतु आपल्या संस्कृति प्रामणे जे हात आपल्या रक्षणासाठी आपल्या सुरक्षेसाठी जीवाची परवा न करता नेहमी पुढे असतात ते हात राखी साठी पात्र असतात. हा सण आत्यावश्क सेवा देणाऱ्या सर्वासोबत साजरा करुन त्यांना ते करत असलेल्या कार्याचा सलाम आणि कौतुक म्हणून हा सण महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या युवती सेलच्या वतीने साजरा करत असल्याचे मत युवती काँग्रेसच्या कल्याणी रांगोळे यांनी व्यक्त केले.
कोरोनाच्या काळात ही आपल्या जीवाची परवा न करणारे डॉक्टर, पोलीस, स्वच्छता कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी, मेडिकल सेवा , किराणा माल सेवा देणारे सर्वान सोबत राखी पोर्णिमा साजरी करुण यावेळी राखी बांधून पेढ़े वाटून तोंडही गोड केले. सोबतच स्वच्छता कर्मचारी यांना आर्सेनिक अल्बम 30 मेडिसिनचे देखील वाटप करण्यात आले. सर्वाना एक वेगळा आनंद देण्याचा प्रयत्न युवक काँग्रेसच्या वतीने केला गेला.