महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दारुड्यांनी गाड्या अडवून लुटलं; विरोध करणाऱ्या माजी सैनिकाचा पत्नी मुलांसमोर भररस्त्यात खून - माजी सैनिकाचा पत्नी आणि मुलासमोर भररस्त्यात खून

Nashik Murder Case : रस्त्यात नागरिकांना लुटणाऱ्या दारुड्यांनी माजी सैनिकांचा पत्नी आणि मुलांसमोरच खून केल्यानं खळबळ उडाली. ही घटना आडगाव - म्हसरुळ लिंक रोडवर सोमवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे.

Nashik Murder Case
दारुड्यांनी गाड्या अडवून लुटलं

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2023, 9:45 AM IST

Updated : Nov 28, 2023, 3:20 PM IST

दारुड्यांनी गाड्या अडवून लुटलं

नाशिक Nashik Murder Case : रस्त्यात गाड्या अडवून लुट करणाऱ्या दारुड्यांना विरोध केल्यानं माजी सैनिकाचा पत्नी आणि मुलासमोर भररस्त्यात खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना नाशिकमधील आडगाव - म्हसरुळ लिंक रोडवर सोमवारी रात्री उशिरा घडली. रवीदत्त चौबे असं खून करण्यात आलेल्या माजी सैनिकाचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयिताना ताब्यात घेतलं आहे. ऋषिकेश उर्फ गटल्या फकीरा दोंदे आणि अथर्व दीपक उगले असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावं आहेत.

रस्त्यातील गाड्या अडवून दारुड्यांकडून लूट :आडगाव - म्हसरुळ लिंक रोडवर सोमवारी रात्री गाड्याअडवून दारुडे लुट करत होते. म्हसरुळ रोडनं आडगावकडं जाताना पेपर मिल समोर चार टवाळखोरांचा हा धिंगाणा सुरू होता. त्यामुळे रस्त्यावर काही वाहने थांबलेली होती. हे दारुडे नागरिकांच्या गाडीवर दगडफेक करुन जबरीनं पैसे उकळत होते.

माजी सैनिकानं विरोध केल्यानं खून :रवीदत्त चौबे हे पत्नी आणि लहान मुलांसोबत म्हसरूळ रोडनं आडगावकडं जात होते. यावेळी पेपर मिल समोर चार टवाळखोर लोकांच्या गाड्या अडवून पैशाची मागणी करत होते. रस्त्यावर काही वाहनं थांबलेली होती. त्याचवेळी रवीदत्त चौबे यांच्या गाडीवर टवाळखोरांनी दगडं फेकत कार थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रवीदत्त चौबे यांनी कार बाजूला पार्क करत संशयितांकडं जाताना टवाळखोरांना ते पोलीस असल्याचं वाटल्यानं त्यातील दोघांनी पलायन केलं. रवीदत्त चौबे यांनी संशयितांचा काही अंतर पाठलाग केला. मात्र संशयितांनी अंधाराचा फायदा घेत रवीदत्त चौबे यांच्यावर हल्ला केला. रवीदत्त चौबे यांच्यावर मारेकऱ्यांनी चार ते पाच वार केले. काही वाहन चालकांनी त्यांना तात्काळ सिव्हिलमध्ये दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

पोलिसांनी दोन संशयितांना घेतलं ताब्यात : घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरील नागरिकांनी केलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी संशयित ऋषिकेश उर्फ गटल्या फकीरा दोंदे आणि अथर्व दीपक उगले यांना ताब्यात घेतलं आहे. मृत रविदत्त चौबे हे भारतीय सैन्य दालातून निवृत्त झाल्यानंतर भुजबळ नॉलेज सिटी इथल्या हॉस्टेलमध्ये वॉर्डन म्हणून नोकरीला होते. रवीदत्त चौबे हे विद्यार्थ्यांना विविध खेळात मार्गदर्शन करत होते.

  • पोलीस हेअर कटमुळे खून :रवीदत्त चौबे हे कारमधून उतरल्यानंतर त्यांचा पोलीस हेअर कट बघून संशयितांनी पोलीस समजून घटनास्थळावरुन पलायन केलं. रवीदत्त चौबे यांनी त्यांचा पाठलाग केला. त्यामुळे पकडलं जाऊ नये, या भीतीनं संशयितांनी वार करत त्यांना ठार केलं असावं अशी शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशीही हत्येचीच घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. तर, तीनच दिवसांपूर्वी शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार घेतलेल्या संदीप कर्णिक यांना संशयितांनी गंभीर घटना घडवून सलामी दिल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी नवीन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे कशी हाताळतात, हे येणारा काळचं सांगेल.

हेही वाचा :

  1. शरीरसंबंधास नकार.. चारित्र्यावर संशय घेत नवविवाहितेची डोक्यात दगड घालून हत्या
  2. नाशिक : सामनगाव येथील 9 वर्षीय मुलाचा खून; संशयित पोलिसांच्या ताब्यात
  3. Dr. Suvarna Vaze Murder Case : पतीनेच हत्या केल्यानंतर जाळला मृतदेह; संदीप वाजेला सात दिवसांची पाेलीस काेठडी
Last Updated : Nov 28, 2023, 3:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details