नाशिक: गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत पाहणी केली असता 13 कॉफी शॉपमध्ये अनाधिकृतपणे अंतर्गत व बाह्यरचनेत अतिक्रमण करून बदल केला असल्याचं पोलीस व महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आढळून आलं. तसेच अमली पदार्थ सेवन तसेच महिलांविरोधी गुन्हे करण्यास पोषक स्थिती निर्माण करण्यात आली होती. त्यामुळे नाशिक महानगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत 13 कॉफी शॉप अनाधिकृत ठरवत सील केली आहेत.
नाशिकमध्ये मुंबई पोलिसांनी छापा टाकत 300 कोटी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. नाशिकमध्ये राजरोसपणे ड्रग्जचा कारखाना सुरू असताना त्याची नाशिक पोलिसांना कल्पना नव्हती का ? असा प्रश्न नाशिककरांना पडला होता. त्यामुळे नाशिक पोलिसांची प्रतिमा मलिन झाली. यामुळे पोलिसांनी आता ही बाब गांभीर्यानं घेत अमली पदार्थांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून पोलीस ठिकठिकाणी असलेल्या अवैध धंद्यांवर धडक कारवाई करत करण्यास सुरवात केली आहे.
Nashik Crime : ड्रग्ज प्रकरणातील मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर पोलिसांना जाग, १३ कॉफी शॉपला ठोकलं टाळं - Gangapur Police Thane
नाशिक शहरातील कॉफी शॉप मध्ये अनधिकृतपणे पार्टिशन तयार करणाऱ्या 13 कॉफी शॉपला नाशिक महापालिका आणि पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत टाळ ठोकलं आहे. तरुण-तरुणींना बेकायदेशीरपणे प्रायव्हसी पुरवणं तसेच या ठिकाणी अमली पदार्थाचे सेवन व अश्लील कृत्यांना आसरा दिला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
Published : Oct 19, 2023, 7:46 AM IST
|Updated : Oct 19, 2023, 7:52 AM IST
गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नऊ कॉफी शॉपवर कारवाई-नाशिक महानगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करत गंगापूर रोड, इंदिरा नगर भागातील काही कॉफी शॉपची तपासणी केली. कारवाईत तरुण-तरुणींना बेकायदेशीरपणे प्रायव्हसी पुरवणं तसेच या ठिकाणी अमली पदार्थाचे सेवन व अश्लील कृत्यांना आसरा दिला जात असल्याच्या कारणावरून 13 कॉफी शॉप सील केली आहेत. या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नऊ कॉफी शॉपवर कारवाई करत सील करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
केबिनमध्ये अल्पवयीन युवक आणि युवतींचे अश्लील चाळे-पोलिसांच्या माहितीनुसार वडाळा- पाथर्डी रस्त्यावर असलेल्या काही कॉफी शॉपमध्ये पडद्यांचा आडोसा घालून छोटेखाने केबीन तयार करून युवक- युवतींना पुरवण्यात येते होते. पोलिसांनी धाड टाकली असता खालच्या बाजूला नियमाप्रमाणे कॉफी शॉप आढळून आले. मात्र त्यातच पार्टिशन करून वरच्या जिन्याने वरच्या बाजूला पडदे टाकून छोटे केबिन केलेल्या आढळून आल्या आहेत. त्यात एक टेबल आणि दोन खुर्ची असे साहित्य मिळून आले. केबिनमध्ये अल्पवयीन युवक आणि युवती अश्लील चाळे करताना पोलिसांना आढळून आले. त्या सर्वांना कडक समज देऊन सोडण्यात आले. मात्र चारही कॅफे चालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा-