ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक पालिकेच्या अखेरच्या महासभेवर तहकुबीची नामुष्की; केवळ सातच नगरसेवक हजर - नाशिक महापौर रंजना भानसी

महानगरपालिकेची महासभा अनेकदा नगरसेवकांच्या गोंधळामुळे महापौरांना तहकूब करावी लागली. मंगळवारची महासभाही तहकूब करण्यात आली आहे. मात्र, आजचे कारण वेगळे होते. कुठलाही गोंधळ न करता अगदी शांततेच्या वातावरणात महासभा तहकूब झाली.

नाशिक पालिकेच्या अखेरच्या महासभेवर तहकुबीची नामुष्की
author img

By

Published : Nov 19, 2019, 6:19 PM IST

नाशिक - महानगरपालिकेची महासभा अनेकदा नगरसेवकांच्या गोंधळामुळे महापौरांना तहकूब करावी लागते. मंगळवारची महासभाही तहकूब करण्यात आली आहे. मात्र, आजचे कारण वेगळे होते. कुठलाही गोंधळ न करता अगदी शांततेच्या वातावरणात महासभा तहकूब झाली. महानगरपालिकेच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले असावे.

नाशिक पालिकेच्या अखेरच्या महासभेवर तहकुबीची नामुष्की

हेही वाचा - चित्रपट महामंडळातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; कोल्हापुरात निषेधाचे पोस्टर जाळले

नाशिक महानगर पालिकेचे सभागृह दरवेळेस कुठल्या ना कुठल्या मुद्द्यावरून नगरसेवकांनी गोंधळ घातल्यावर सभागृह चर्चेत येते. सभागृहात नागरसेवकांचा राडा नेहमीच पहायला मिळत असतो. मंगळवारी मात्र अगदी उलटे घडले. महापौरांना महासभा तहकूब करावी लागली. सभागृहात नगरसेवकांची गणसंख्या पुरेशी नसल्याने सभागृह तहकूब करण्यात आले. 122 नगरसेवकांपैकी फक्त 7 नगरसेवक महासभेला उपस्थित होते. काही नगरसेवक सहलीला गेलेले आहेत. त्यामुळे शेवटच्या महासभेत महापौर रंजना भानसी यांना आभार निवेदन करण्याची देखील संधी मिळाली नाही. त्यांना गणसंख्ये अभावी महासभा तहकूब करण्याची नामुष्की ओढवली.

आजच्या महासभेत सिबीएससीच्या शाळा सुरू करणे, पिडब्ल्यूडी मॅन्युअल अन्वये 10 टक्के अधिक कामास मंजुरी, वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरणे अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार होती. उपस्थित नगरसेवकांनी मात्र कुठलीही प्रतिक्रिया न देता शांततेत सभागृहातून बाहेर पडले. त्यामुळे महापौर निवडणुकीच्या चर्चेऐवजी पालिकेची महासभा शांततेत पार पडली.

हेही वाचा ...तर भाजपला मोठी किंमत मोजावी लागेल, संजय राऊतांचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details