नाशिक - महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच कोरोनामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून महासभा पार पडली. नेहमीप्रमाणे होणारी महासभा ऑनलाइन असतानाही वादळी ठरली. विशेष म्हणजे जितका गोंधळ सभागृहात होत तितकाच गोंधळ ऑनलाइन असतानाही झाला आहे. कोरोनामुळे नाशिक महानगरपालिकेला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून महासभा घ्यावी लागली. विशेष म्हणजे मनपाने हा प्रयोग इतिहासात पहिल्यांदाच केला आणि तो यशस्वी झाला आहे.
नाशिक मनपाची ऑफलाईन नव्हे तर ऑनलाईन महासभाही चर्चेचा विषय - नाशिक मनपा बातमी
कोरोनामुळे नाशिक महानगरपालिकेला व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून महासभा घ्यावी लागली. विशेष म्हणजे मनपाने हा प्रयोग इतिहासात पहिल्यांदाच केला आणि तो यशस्वी झाला आहे.
![नाशिक मनपाची ऑफलाईन नव्हे तर ऑनलाईन महासभाही चर्चेचा विषय नाशिक मनपाची ऑफलाईन नव्हे तर ऑनलाईन महासभाही चर्चेचा विषय](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7398927-293-7398927-1590762619517.jpg)
एक गोष्ट मात्र यात नाशिकच्या लोकप्रतिनिधींनी कायम ठेवली. ऑनलाइन असतानाही नेहमीप्रमाणे गोंधळ घातला. प्रत्येकाची ठिकाणी वेगळी असली तरी आवाजाची उंची मात्र मिनिटामिनिटाला वाढत होती. त्यातच अर्थसंकल्प महासभा असल्याने आर्थिक विषय होता. त्यामुळे बोलण्यासाठी आग्रही होता त्यातच ऑनलाइनचा विषय म्हटले तर विचारायलाच नको. मात्र, याही काळात शिवसेनेने विरोधी पक्ष म्हणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपला महासभेत चिमटे काढले. स्मार्ट सिटी योजना आणि बससेवेवर सडकून टीका करत ही कामे कोरोनामुळे थांबवावी मात्र नाशिकचा विकास थांबवू नका, अशी भूमिका घेतली.
याच काळात मात्र शिवसेनेची ही भूमिका पाहून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सेनेवर हल्लाबोल करत भ्रष्टाचारचे आरोप केले. सोबतच बोलू दिले नाही म्हणून नगरसेवकांनी महासभा घेतलीच कशाला असा सवाल उपस्थित केला. यावर मात्र सत्ताधारी भाजपने ऑनलाइनचा प्रयोग यशस्वी झाल्याबद्दल आभार मानत जवळपास २३९० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर केला. कोरोनाच्या काळात खर्च कमीची मागणी केली असली तरी अर्थसंकल्पात तरतूद कायम ठेवली आहे. कोरोनाच्या काळात नाशिक मनपाने हा नवा पायंडा पाडला असून त्याला प्रतिसाद चांगला मिळाला. मात्र, लोकप्रतिनिधीनी सभागृहात गोंधळाची परंपरा ऑनलाइन सभेतही कायम ठेवल्याचे दिसून आले.