महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

२ दिवसात २२ लाख घरपट्टी न भरल्यास महापालिकेकडून काँग्रेस कार्यालय जप्तीचे आदेश - काँग्रेस कार्यालय

२ दिवसांत २२ लाखांची थकीत घरपट्टी भरली नाही तर, कॉग्रेस कार्यालयाला टाळे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील २ दिवसात थकबाकी भरली नाही तर कॉग्रेस कमिटी अडचणीत येणार आहे.

हेमलता पाटील

By

Published : Mar 22, 2019, 11:56 AM IST

नाशिक- मार्च महिना असल्याने महानगरपालिकेने थकीत घरपट्टी धारकांना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये नाशिकच्या मुख्य काँग्रेस कमिटी कार्यालयाचा देखील समावेश आहे. २ दिवसांत २२ लाखांची थकीत घरपट्टी भरली नाही तर, कॉग्रेस कार्यालयाला टाळे लागण्याची शक्यता आहे.

काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांची प्रतिक्रिया


एकीकडे काँग्रेस लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहे. परंतु, दुसरीकडे नाशिकच्या मुख्य काँग्रेस कार्यालयाला टाळे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गतवर्षी प्रमाणे यंदाही मोठ्या थकबाकीदारांमध्ये काँग्रेस कमिटीचा समावेश आहे. २२ लाखांच्या थकबाकी प्रकरणी महानगरपालिकेच्या विविध कर विभागाने काँग्रेस कमिटीचे जप्तीचे वॉरंट काढले आहे.
कर थकबाकी प्रकरणी काँग्रेसच्या प्रवक्या हेमलता पाटील म्हणाल्या, २ दिवसात बैठक घेऊन थकीत रक्कम भरू. काँग्रेस कमिटी घरपट्टी थकबाकीबाबत आम्ही सर्व पदाधिकारी नगरसेवक एकत्र येऊन बैठक घेऊन पैसे भरू.

मागील वर्षीप्रमाणे पैसे कोणी भरायचे ह्यावरून काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू आहे. गतवर्षीप्रमाणे आर्थिक पदरमोड करणारे महानगरपालिकेतील काँग्रेस नगरसेवक ४ हात लांब झाले आहेत. दुसरीकडे शहर आणि जिल्हाध्यक्षावर कर भरण्याची जबाबदारी आली आहे. परंतु, अन्य पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळत नाही. त्यामुळे पुढील २ दिवसात थकबाकी भरली नाही तर कॉग्रेस कमिटी अडचणीत येणार आहे.

मागील पैसे गेले कुठे ?


गेल्या वर्षी मार्चमध्ये काँग्रेस कमिटीला सुमारे २६ लाख रुपयांची घरपट्टी थकीत असल्यामुळे जप्तीचे वॉरंट आले होते. त्यानंतर, माजी नगरसेवक आणि माजी मंत्री यांनी १ ते २ लाखांपर्यंत वैयक्तीक तसेच जिल्हा काँग्रेसकडून १२ लाख अशा पध्दतीने पैसे गोळा केल्याचे सांगण्यात आले होते. स्थायी समितीच्या नगरसेवकानीही मदत केली होती. त्यावेळी घरपट्टीसाठी साधारण २० लाखांपर्यँत वर्गणी जमा झाली होती असा अंदाज आहे. तर, आता २२ लाख रुपयांची नोटीस का?, असा संशय व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details