नाशिक - कोरोनासारख्या महामारीवर मात करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून चार अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये या मुख्य उद्देशाबरोबर कोरोनाच्या काळातील गरजा अॅपच्या माध्यमातून पुरविल्या जाणार आहेत. या ॲपमधून नाशिककरांना कोरोनाविषयी ज्या काही समस्या किंवा प्रश्न असतील त्या प्रश्नांवर नाशिकमधील नोंदणीकृत व तज्ज्ञ डॉक्टर नाशिककरांना मार्गदर्शन करणार आहेत.
ह्या अॅपद्वारे नागरिक सरकारी डॉक्टर्स, कोरोनातील तज्ज्ञ डॉक्टर, रुग्णवाहिका यांच्याशी थेट संपर्क साधू शकणार आहे. तसेच मूलभूत गरजांसाठी लागणाऱ्या सुविधांची माहितीही त्यांना येथे मिळू शकते. महत्वाचे म्हणजे जवळपास राहणाऱ्या किंवा चुकीच्या मार्गाने शिरकाव करणाऱ्या कोरोना संशयीत रुग्णबद्दल तुम्ही सरकारी अधिकाऱ्याला सूचित करून आपली सुरक्षा निश्चित करता येणार आहे. कोडवेल टेक्नॉलॉजीने हे चार अॅप्स नाशिक मनपाला तयार करून दिले आहेत. त्यामुळे नाशिककरांनी या अॅपचा वापर करावा आणि घरात सुरक्षित राहून प्रशासनाला मदत करा असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
अॅपची वैशिष्ट्ये -
१. शहरातील सरकारी दवाखान्याची लिस्ट - अॅपमध्ये शहरातील सर्व सरकारी दवाखान्यांची नावे आणि संपूर्ण पत्ता तसेच नंबरही आहे. संशयीत रुग्ण तेथे फोनद्वारे किंवा दाखवलेल्या पत्त्यावर भेट करू शकतो
२. थेट डॉक्टरांची संपर्क -वातावरणातील बदल किंवा इतर कारणाने सर्दी, खोकला, ताप अशी कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळल्यास तुम्ही ह्या अॅपद्वारे थेट त्या डॉक्टरांशी संपर्क करून योग्य उपचार किंवा सल्ला मिळवू शकता.