महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'धान्य किराणा व्यापाऱ्यांचा बंद अखेर मागे, सेसप्रश्नी लवकरच तोडगा' - nashik apmc news

नाशिकमध्ये कृषी उत्पन्न बाजारसमितीकडून धान्य किराणा व्यापाऱ्यांकडून सेस वसुल करण्यात येत असल्याने सुरू केलेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. बाजारसमिीतच्या सभापतींना या सेसबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

'धान्य किराणा व्यापाऱ्यांचा बंद अखेर मागे
'धान्य किराणा व्यापाऱ्यांचा बंद अखेर मागे

By

Published : Dec 14, 2020, 9:00 AM IST

Updated : Dec 14, 2020, 9:30 AM IST

नाशिक- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने धान्य किराणा व्यापाऱ्यांकडून एक टक्का सेस वसुली करण्यात येत होती. याला विरोध करत गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला बंद व्यापाऱ्यांनी अखेर मागे घेतला आहे. बाजार समिती सभापती आणि व्यापारी प्रतिनिधींच्या बैठकीत सभापती देवीदास पिंगळे यांनी सेसप्रश्नी लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. शरदचंद्र पवार मार्केट यार्डात पाच दिवसांपासून बेमुदत बंद सुरू होता.

'धान्य किराणा व्यापाऱ्यांचा बंद अखेर मागे,

कर अधिभार वसुलीस विरोध-

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत १ डिसेंबरपासून धान्य व्यापाऱ्यांकडून १ टक्का सेवा शुल्क वसूल केले जात आहे. मात्र या सेवा शुल्क वसुलीला नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेने विरोध दर्शवित शरदचंद्र पवार मार्केट यार्डात पाच दिवसांपासून बेमुदत बंद पुकारला होता. यासंदर्भात शुक्रवारी (ता.११) बाजार समिती कार्यालयात बैठक झाली. यात जिल्हा उपनिबंधकांनी बंद मागे घेण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले होते. मात्र व्यापारी आंदोलनावर ठाम होते.

धान्य पुरवठ्याचा तुटवडा टाळण्यासाठी निर्णय-

दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता.१२) संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी पत्रकार परिषद घेऊन ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत बंद मागे न घेण्याचा पवित्रा घेतला होता. यापुढे आणखी आंदोलन तीव्र केले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे शहरात धान्य तुटवडा होऊन नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, अशी परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे हाल होऊ नये, तसेच व्यापाऱ्यांचेही आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी बाजार समिती सभापती पिंगळे यांनी रविवारी व्यापारी प्रतिनिधींशी बैठक घेतली. या बैठकीत सभापती पिंगळे यांनी व्यापाऱ्यांशी सविस्तरपणे चर्चा करून सेसप्रश्नी लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन दिले. तोपर्यंत बंद मागे घ्यावा, असेही आवाहन केले. त्यानुसार व्यापाऱ्यांनी बंद मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. या बैठकीला बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे, काही संचालक यांच्यासह व्यापारी प्रतिनिधी मनोज वढेरा, अशोक वैश्य, कल्पेश बेदमुथा, नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेचे सेक्रेटरी राकेश भंडारी आदी उपस्थित होते.

योग्य तो तोडगा काढू, ग्वाही दिल्यामुळे बंद मागे -

शरदचंद्र पवार मार्केटमधील व्यापारी व बाजार समिती यांची संयुक्त बैठक झाली. यात सकारात्मक चर्चा झाली. सभापती देवीदास पिंगळे यांनी सेसप्रश्नी योग्य तो तोडगा काढू, अशी ग्वाही दिल्यामुळे आम्ही बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला.असल्याचे राकेश भंडारी, सेक्रेटरी नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटना यानी सांगितले आहे..

Last Updated : Dec 14, 2020, 9:30 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details