महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 24, 2019, 9:25 AM IST

ETV Bharat / state

स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत नाशिक मॅरेथॉनला सुरवात..

यावर्षी १५ हजारहून अधिक स्पर्धक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल आणि अंध धावपटू अमर जीत सिंग चावला यांची प्रमुख उपस्थिती होती.

नाशिक मॅरेथॉन

नाशिक - ‘प्रचार आणि प्रसार’ करण्याच्या उद्देशाने शहर पोलीस आयुक्तलयाकडून नाशिक मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे या स्पर्धेचे ४ थे वर्ष असून शहर पोलीस आणि समस्त नाशिककरांनी या स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला आहे. यावर्षी १५ हजारहून अधिक स्पर्धक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देत मॅरेथॉन धावणार आहे. यावेळी प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल आणि अंध धावपटू अमर जीत सिंग चावला यांची प्रमुख उपस्थिती होती.

नाशिक मॅरेथॉन

यात ४२ किलो मीटर, २१ किलोमीटर, १० किलोमीटर, ५ किलोमीटर, ३ किलोमीटर, अशा गटात संपन्न झाल्या. यासाठी १५ हजाराहून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. सहभागी स्पर्धकांना टी-शर्ट देण्यात आले आहेत. स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी मॅरेथॉन मार्गवर संगीत, ढोल पथक, बँड, नृत्यचं आयोजन करण्यात आले होते. यात अनेक शाळा तसेच सांस्कृतिक मंडळांचा सहभाग होता. प्रत्येक स्पर्धकाला पाणी, एनर्जी ड्रिंक, वैद्यकीय सुविधा, स्वच्छता गृह आदींची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details