मनमाड (नाशिक) - कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या मनमाड शहरात 09 नवे रुग्ण आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. यातील 6 जणांचा मृत्यू झाल्याने शहरातील नागरिक तसेच प्रशासनाची धावपळ उडाली आहे. शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता शतकापार गेली असून यापैकी 59 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 38 जणांवर उपचार सुरू आहेत.
सध्या शहरातील कोरोना सेंटरमध्ये 28 जणांवर उपचार सुरू आहेत. 8 जणांवर होम क्वारंटाईन उपचार सुरू असून नाशिक येथे 2 जणांवर उपचार सुरू आहेत. तर एकूण 59 जणांनी कोरोनावर मात मिळवली आहे. शहरातील पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या घरातील जवळपास 21 जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यांचे अहवाल प्रलंबित असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. प्रशासन एवढी काळजी घेत असताना नागररिक हलगर्जीपणा करत आहेत. अनेक ठिकाणी विनाकारण गर्दी करणे काम नसताना गावात फिरणे मास्क न वापरणे. यामुळे देखील संसर्ग वाढत आहे. आता पावसाळ्याच्या दिवसांत नव्याने रुग्ण वाढण्याची शक्यता देखील डॉक्टरानी बोलून दाखवली आहे.