नाशिक - राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या दीड महिन्यांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवारांसाठी चाचपणी सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) देखील यामध्ये मागे नाही. मनसेनेकडून सुद्धा आता विभानिहाय बैठका घेऊन उमेदवारांबाबत चाचपणी केली आहे.
विधानसभेसाठी मनसेची राज्यभर चाचपणी; नाशिकचा गड पुन्हा मिळवण्यासाठी कसली कंबर - नाशिक बातम्या
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसेने पुन्हा एकदा नाशिकमध्ये आपला गड राखण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच आता आघाडीसोबत मनसे युती करणार की, एकला चलोचा नारा देते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
नाशिकमध्ये मनसे नेते संदीप देशपांडे आणि अभिजित पानसे यांच्या प्रमुख उपस्थिती बैठक पार पडली. यावेळी राज्यात मनसे विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकेकाळी नाशिक हा मनसेचा गड म्हणून ओळखला जात होता. नाशिकमध्ये मनसेचे तीन आमदार होते. महापालिकाही मनसेच्या ताब्यात होती. मात्र, २०१४ नंतर नाशिकमध्ये मनसेचे वर्चस्व कमी-कमी होत गेले. शहरात फक्त आता चारच मनसेचे नगरसेवक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसेने पुन्हा एकदा नाशिकमध्ये आपला गड राखण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच आता आघाडीसोबत मनसे युती करणार की, एकला चलोचा नारा देते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.