नाशिक - पश्चिम बंगाल येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय येथे डॉ. परिबा मुखर्जी या तरुण डॉक्टरवर पेशंटच्या नातेवाईकांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. सदर डॉक्टर अत्यवस्थ असून त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिकच्या वतीने काळ्या फिती लावून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
पश्चिम बंगालमधील डॉक्टरवरील हल्ल्याविरोधात आयएमए नाशिक शाखेच्यावतीने काळ्याफिती बांधून निषेध - इंडियन मेडिकल असोसिएशन
पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिकच्या वतीने काळ्या फिती लावून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

पश्चिम बंगालमधील डॉक्टरवरील हल्ल्याविरोधात आयएमए नाशिक शाखेच्यावतीने काळ्याफिती बांधून निषेध
पश्चिम बंगालमधील डॉक्टरवरील हल्ल्याविरोधात आयएमए नाशिक शाखेच्यावतीने काळ्याफिती बांधून निषेध
अशा गोष्टींमुळे रुग्णालय कर्मचारी आणि वैद्यकीय व्यवसायिक सातत्याने दहशतीच्या खाली असल्याने त्यांची कार्यक्षमता खालावते. याचा थेट रुग्णांच्या म्हणजे समाजाच्या आरोग्य व्यवस्थेवर दीर्घकालीन आणि विपरीत परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे केंद्र सरकारने या सर्व प्रकारच्या आरोग्य आस्थापनावर होणारे हिंसाचार रोखण्यासाठी तातडीने एक केंद्रीय कायदा करून आरोग्य रक्षकांचे रक्षण करावे, तसेच मारहाण करणाऱ्यांवर त्वरित कठोर कारवाई करावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने करण्यात आली.