नाशिक- राज्यात आणि देशात जे विषय गरजेचे नाही त्यावर चर्चा केली जाते आणि वाद होतो. मात्र, गोरगरिबांच्या समस्यांवर चर्चा होत नसल्याची खंत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. त्र्यंबकेश्वरमध्ये त्यांनी आज निवृत्तीनाथांच्या समाधीचे दर्शन घेतले, त्यावेळी ते बोलत होते
दर्शन घेताना पालकमंत्री छगन भुजबळ मागील 5 वर्षांत जी कामे झाली नाहीत. तो बॅकलॉक भरून काढणार असल्याचे सांगत त्यांनी मागील सरकारवर निशाणा साधला. आज (दि. 20 जाने.) संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा असल्याने भुजबळ यांनी सपत्नीक या सोहळ्याला हजेरी लावत महापूजा केली.
राज्यातील कानाकोपऱ्यातील हजारोंच्या संख्येने वारकरी त्रंबकेश्वर येथे दोन दिवसांपासून दाखल झाले आहेत. कडाक्याच्या थंडीत देखील हातात भगव्या पताका, महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन आणि पालख्या सोबत असलेले भालदार, चोपदार, टाळ, मृदुंगाच्या गजरात अखंड हरिनामाचा गजर करत तल्लीन झाले. कडाक्याच्या थंडीतही भल्या पहाटेपासून दर्शनासाठी आस लागून असलेले वारकरी रांगेत उभे असल्याचे दिसून आले. त्र्यंबकेश्वर नगरी भक्तिमय वातावरणाने नाहून निघाली.
हेही वाचा - संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज यात्रोत्सव, लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल