शिर्डी : नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूकीची मतमोजणी सुरु असतांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या देवदर्शनसाठी शिर्डीत आल्या आहेत. सकाळी त्रंबकेश्वरला महादेवच दर्शन घेतल्या नंतर दुपारी शिर्डीत साईसमाधीचे पाटील यांनी दर्शन घेतले. या निवडणुकीत वारशाने नव्हे तर, कामाने आमदार होणार असल्याचे पाटील म्हणाल्या आहे.
ते आमदार होणार नाहीत :मतमोजनी सुरु होण्या आधीच सत्यजीत तांबे यांच्या विजयाचे फलक सगळीकडे लागल्याचे दिसुन येत आहेत. यावर शुभांगी पाटील यांना विचारले असता केवळ पोस्टर लावुन कोणी आमदार होत नाही. त्यांनी सांगीतल म्हणुन ते आमदार होणार नाहीत. सगळीकडे पोस्टर लागलेले बघता नाशिक मतदार संघात काही वेगळ घडतय का असा सवालही शुभांगी पाटील उपस्थीत केला. लागलेल्या पोस्टर बाबत निवडणूक आयोग योग्य भुमिका घेईल असे पाटील यांनी म्हटले आहे.
प्रस्थापितांन विरोधात निवडणूक :या निवडणुकीत प्रस्थापितांन विरोधात निवडणुक लढवावी लागली आहे. खर तर बाबासाहेब आंबेडकरांनी एक शिक्षक, एक पदवीधर आमदार दिला होता. त्यांना वाटल नव्हत की यात राजकीय वलय येईल. सुशिक्षित लोक या प्रवाहात यायला हवे असे त्यांना वाटले होते. नाशिक पदवीधर निवडणुकीत मी पदवीधर म्हणुन उमेदवारी केली ही आता सुरवात आहे. अजुन बरच काही घडेल ही तर केवळ थिनगी पडली असल्याच शुभांगी पाटील यांनी म्हटले आहे.