महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik Graduate Constituency Election : नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी मतदान सुरू, सत्यजीत तांबे-शुभांगी पाटील यांच्यात लढत

नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी मतदान होत आहे. प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी केली आहे. पाच जिल्ह्यांत 338 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. मतदारांसाठी एका दिवसाची रजा मंजूर करण्यात आली आहे. सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे यांनी दिली. या निवडणुकीत 2 लाख 62 हजार 721 मतदार आहेत. 16 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.

By

Published : Jan 30, 2023, 10:04 AM IST

Nashik Graduate Election
नाशिक पदवीधर निवडणूक

नाशिक :नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. सर्वाधिक 45 टक्के मतदार अहमदनगर जिल्ह्यात आहेत. नगरमध्ये एक लाख 15 हजार 638 मतदार असून नाशिक जिल्ह्यात 69 हजार 652 तर, जळगाव मध्ये 35 हजार 58, धुळे 23 हजार 412 आणि नंदूरबारमध्ये 18 हजार 971 मतदार आहेत. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि शिवसेना पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. असे एकूण या निवडणुकीत 16 उमेदवार रिंगणात असून, 2 लाख 62 हजार 721 मतदार आहेत.


नाशिक विभागात 338 मतदान केंद्रे : नाशिक विभागातील मतदान केंद्रांचीही संख्या जाहीर करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सर्वाधिक 147 मतदान केंद्रे अहमदनगर जिल्ह्यात आहेत. नाशिकमध्ये 99, जळगाव जिल्ह्यात 40, धुळ्यात 29 आणि नंदूरबार जिल्ह्यात 23 मतदान केंद्रे आहेत. नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्रे आहेत. मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सोमवारी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान करता येणार आहे.


मतदानाच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी मतदानाच्या दिवशी म्हणजे 30 जानेवारी रोजी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने 25 जानेवारी 2023 रोजी त्यासंबंधीचे आदेश पारित केले आहेत. यादिवशी मद्य विक्रीसाठी ड्राय डे पाळणे बंधनकारक असणार आहे.


तांबे आणि पाटील यांच्यात मुख्य लढत : एकीकडे महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांनी जोरदार प्रचार केला आहे. आपल्याला विजय खेचून आणायचा आहे हे लक्ष्य ठेवून सगळे काम करत आहेत. हा विजय आमचाच होणार आहे असंही शुभांगी पाटील यांनी म्हटले आहे. नगरमध्ये नाना पटोले यांनी माझ्यासाठी माझ्यापेक्षा जास्त प्रचार केला. जयंत पाटील, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे की, माझ्या विरोधात कुणी जाईल, मी निवडून येईन. असे शुभांगी पाटील यांनी म्हटले आहे. दुसरीकडे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियासह मतदारांशी जनसंपर्क वाढविला आहे.


हेही वाचा :Nana Patole On Satyajeet Tambe : आम्हाला संशय होताच! सत्यजित तांबेंबाबत नाना पटोलेंचे वक्तव्य

ABOUT THE AUTHOR

...view details