नाशिक - पाण्याच्या शोधार्थ भटकंती करणारे हरीण कोरड्या विहिरीत पडल्यानंतर वनविभागाच्या मदतीने ग्रामस्थांनी त्याला वाचवले आहे. नांदगावातील सारतळे येथील ही घटना असून, जखमी हरणांवर वनविभागाच्या कार्यालयात उपचार सुरू आहेत.
पाण्याच्या शोधात हरीण पडले विहिरीत, वनविभागाने दिले जीवदान
उन्हाळ्याची चाहूल लागण्याचे चिन्ह दिसत असतानाच पाण्याच्या शोधार्थ भटकंती करणारे एक हरीण कोरड्या विहिरीत पडले. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी धडपड करत असणाऱ्या हरणाला विहिरी बाहेर पडता येत नव्हते.
हेही वाचा -निष्ठेला सलाम ! आठ महिन्याच्या गर्भवती असूनही नमिता मुंदडा मतदार संघाच्या प्रश्नांसाठी विधानसभेत
उन्हाळ्याची चाहूल लागण्याचे चिन्ह दिसत असतानाच पाण्याच्या शोधार्थ भटकंती करणारे एक हरीण कोरड्या विहिरीत पडले. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी धडपड करत असणाऱ्या हरणाला विहिरी बाहेर पडता येत नव्हते. दरम्यान, विहिरीच्या बाजूने जाणाऱ्या एका शेतकऱ्याला हे लक्षात आल्याने त्याने वनविभागाला कळवले. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यावर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्या हरणाला बाहेर काढण्यात आले. दरम्यान, विहिरीत पडलेले हे हरीण जखमी झाले असून पशुवैद्यकीय दवाखान्यात त्यावर उपचार करून वनविभागाच्या कार्यालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या हरणांसाठी वनविभागाने कृत्रिम पाणवठे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली.
हेही वाचा -नवाब मलिक समोर भाजपच्या भाई गिरकरांची बोलती बंद