महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nashik Drug Case: नाशिक ड्रग्जचा अड्डा ; 3 किलो अमली पदार्थाचा साठा जप्त, नाशिक पोलिसांची मोठी कारवाई - नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

Nashik Drug Case : गुरुवारी रात्री मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी नाशिक येथील फॅक्टरीवर छापा टाकून ३०० कोटींच्या अमली पदार्थासह आरोपीला अटक केली होती. त्यानंतर आता नाशिकरोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं पुन्हा त्याच गावात आणखी एका कारखान्यावर छापा टाकून ड्रग्जसाठी लागणारा करोडो रुपयांचा कच्चा माल जप्त केलाय.

Nashik Drug Case
नाशिक ड्रग्ज साठ्यावर कारवाई

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 12:29 PM IST

Updated : Oct 8, 2023, 5:37 PM IST

नाशिक Nashik Drug Case : मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी गुरुवारी रात्री नाशिक इथल्या फॅक्टरीवर छापा टाकून ३०० कोटींच्या अमली पदार्थांसह आरोपीला अटक केली. या घटनेच्या काही तासानंतरच आता नाशिकरोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं पुन्हा त्याच गावात आणखी एका कारखान्यावर छापा टाकून ड्रग्जसाठी लागणारा करोडो रुपयांचा कच्चा माल जप्त केलाय.

दोन दिवसांपूर्वी केला 300 कोटींचा साठा जप्त : दोन दिवसांपूर्वी ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याच्या शिंदे पळसे परिसरात असलेला श्री गणेशाय इंडस्ट्रीज या ड्रग्ज निर्मिती कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापा टाकला होता. या छाप्यात मुंबई पोलिसांनी 265 करोडचे 135 किलो ड्रग्ज जप्त केलं. या घटनेला काही तास उलटत नाही, तोच याच भागात नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं मालक दत्तू जाधव यांच्या मालकीच्या गोडाऊनवर छापा टाकला. या छाप्यात करोडो रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात मिळणाऱ्या एमडी ड्रग्जचा नाशिकरोड भागातून पुरवठा होतो की काय, असा प्रश्न उपस्थित झालाय. पुणे इथून ड्रग्ज माफिया व नाशिक रोडमधील रहिवासी असलेला ललित पाटील हा रुग्णालयातून फरार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी साकीनाका मुंबई पोलिसांनी शिंदे गावात एमडी अमली पदार्थ तयार होणारा कारखाना उद्ध्वस्त केलाय.



नाशिक पोलीस अ‍ॅक्शन मोडवर : नाशिक पोलिसांच्या नाकावर टिचून मुंबई पोलिसांनी नाशकात येऊन करोडो रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला. या घटनेनंतर नाशिक पोलिसांनी वडाळा भागात कारवाई करत एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या महिलेसोबत एका व्यक्तीस ताब्यात घेतलं. यांच्याकडून दोन लाख रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आलं. त्यानंतर नाशिक रोड पोलिसांनी शिंदे गाव परिसरात असलेल्या एमआयडीसीतील कंपनी आणि गोदामांची माहिती घेणं सुरू केलं. याच परिसरात आणखी एका गोदामात संशयास्पद साहित्य असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शिंदे गावातील मनोज हॉटेल जवळ असलेल्या दत्तू जाधव नामक व्यक्तीच्या गोडाऊनवर छापा टाकून एमडी ड्रग्जसाठी लागणारा कच्चामाल व अंशतः तयार झालेले ड्रग्ज ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान, या कारवाईनंतर नाशिकमध्ये ड्रग्जचे मोठे रॅकेट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Last Updated : Oct 8, 2023, 5:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details