नाशिक - एप्रिलचा पंधरवडा सुरु होताच जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा असह्य होत ( Nashik Drought ) असून, ग्रामीण भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. यंदाच्या हंगामात जिल्ह्यात पहिला टँकर येवला तालुक्यात सुरु झाला. या ठिकाणी तीन टँकर आहे. तर, बागलाण व सिन्नर तालुक्यात प्रत्येकी दोन टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. येत्या काळात टँकरची संख्या वाढण्याची चिन्हे ( Six Tanker Water Supply ) आहेत.
तीन तालुक्यांत सर्वांधिक टंचाई -मागील दोन वर्षांपासून वरुणराजाने समाधानकारक हजेरी लावल्याने जिल्ह्यातील धरणांत आजमितीला पन्नास टक्क्यांहून अधिक जलसाठा आहे. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत पाणी टंचाई फारशी जाणवली नाही. पण, एप्रिल सुरु होताच जिल्ह्यात अनेक गाव, वाड्या व वस्त्यांवर पाण्याच्या दुर्भिक्ष्याला तोंड द्यावे लागत आहे. त्याचपार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडे टँकरच्या मागणीचे प्रस्ताव प्राप्त होत आहे. सर्वाधिक टंचाई ही दुष्काळी भाग असलेल्या येवला, बागलाण, सिन्नर तालुक्यात आहे.