महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल- जिल्हाधिकारी - Nashik collector on corona update

जिल्हा प्रशासन, वैद्यकीय विभाग, मनपा प्रशासन यासह विविध यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत. यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी व मिशन झिरो नाशिक यासारख्या उपाय योजनांचा समावेश आहे.

नाशिकचे जिल्हाधिकारी व इतर अधिकारी
नाशिकचे जिल्हाधिकारी व इतर अधिकारी

By

Published : Oct 21, 2020, 3:51 PM IST

Updated : Oct 21, 2020, 4:01 PM IST

नाशिक - जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून थैमान घातलेला कोरोना मोठ्या प्रमाणावर नियंत्रणात आल्याचे दिसते. जिल्ह्यात कोरोनामधून रुग्ण बरे होण्याचा दर 79 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याच्या आकडेवारीत नाशिक राज्यात पाचव्या स्थानावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली. जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल, असा त्यांनी विश्वासही त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने मोठी वाढ सुरू होती. ही वाढती रुग्णसंख्या रोखायची कशी हा मोठा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर उभा ठाकला होता. त्यामुळे सर्वच प्रशासकीय यंत्रणाही हतबल झाल्या होत्या. मात्र ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच प्रमाण हे नियंत्रणात आले आहे. रुग्णवाढीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. यात सगळ्यात मोठा दिलासा म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आता 79 टक्क्यांवर आले आहे.

नाशिक जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल

जिल्हा प्रशासन, वैद्यकीय विभाग, मनपा प्रशासन यासह विविध यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत. यात माझे कुटुंब, माझी जबाबदारी व मिशन झिरो नाशिक यासारख्या उपाय योजनांचा समावेश आहे. यामुळे कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग कमी झाला आहे. कोरोनामुक्त होण्याऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. असे असले तरी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अशी आहे जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती-

जिल्ह्यातील 81 हजार 937 कोरोना बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यात 6 हजार 520 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आजतागायत 1 हजार 613 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Last Updated : Oct 21, 2020, 4:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details