नाशिक - लॉकडाऊनचा परिणाम आता समोर येऊ लागला आहे. सर्वच क्षेत्रात मंदीचे वातावरण असून आर्थिक चणचण भासत आहे. नाशकात छोट्या मोठ्या ऑर्केस्ट्रामध्ये काम करणाऱ्या अनेक कलावंतांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. अशातच नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनने या गरजू कलावंतांना मदतीचा हात दिला आहे. काही दानशूरांच्या मदतीने या 200 कलावंतांना प्रत्येकी 3 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात येत आहे.
लॉकडाऊनचा स्थानिक कलावंतांवर परिणाम, नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनकडून मदत - लॉकडाऊनचा स्थानिक कलावंतांवर परिणाम
जवळपास अडीच महिन्यांपासून नाशिकमधील चित्रपट गृहे, कलामंदिर तसेच सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत. यामुळे स्थनिक कलाकारांवर आर्थिक संकट ओढावले आहे. नाशिक शहरातील ऑर्केस्ट्रा व्यवसायावर 550 कलाकारांचे कुटुंब अवलंबून आहे. यात गायक, वादक, नृत्यकार, मिमीक्री आर्टिस्ट, निवेदक अशा अनेकांचा समावेश आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाल्यानंतर सामाजिक अंतर राखण्यासाठी सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. जवळपास अडीच महिन्यांपासून नाशिकमधील चित्रपट गृहे, कलामंदिर तसेच सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत. यामुळे स्थनिक कलाकारांवर आर्थिक संकट ओढावले आहे. नाशिक शहरातील ऑर्केस्ट्रा व्यवसायावर 550 कलाकारांचे कुटुंब अवलंबून आहे. यात गायक, वादक, नृत्यकार, मिमीक्री आर्टिस्ट, निवेदक अशा अनेकांचा समावेश आहे. यातील जवळपास 200 कलाकारांचे कुटुंब हे फक्त ऑर्केस्ट्रा व्यवसायावर अवलंबून आहे.
लॉकडाऊन काळात हाताला कुठलेच काम नसल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न या कलाकारांना भेडसावत होता. अशात नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनने या कुटुंबाना दोन महिने पुरेल एवढा किरणा माल तसेच प्रत्येकी 3 हजार रुपयांची मदत देऊ केली आहे.