महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल - पालकमंत्री छगन भुजबळ - नाशिक कोरोना न्यूज

जिल्ह्यात सद्यस्थितीत रेमडिसिव्हीर, ऑक्सिजन यांचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. त्याचप्रमाणे आज जिल्ह्यात रेमडिसिव्हीरची 8 हजार इंजेक्शन्स व 50 मेट्रीक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. त्यानुसार रुग्णांना कोणत्याही औषधांची व ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, यासाठी प्रशासनामार्फत योग्य उपाययोजना करण्यात येत आहेत, असे पालकमंत्री भुजबळ म्हणाले.

नाशिक कोरोना न्यूज
नाशिक कोरोना न्यूज

By

Published : Oct 11, 2020, 12:35 PM IST

Updated : Oct 11, 2020, 1:46 PM IST

नाशिक -जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 761ने कमी झाली आहे. त्यात असणारे सातत्य पाहता जिल्ह्यातील कोरोना संसर्ग नियंत्रणात असून जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करतोय, असे दिलासादायक प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज केले.

नाशिक जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल - पालकमंत्री छगन भुजबळ

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात शहरातील व जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती व उपाययोजनांसंबंधी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. जिल्ह्यात सद्यस्थितीत रेमडिसिव्हीर, ऑक्सिजन यांचा पुरवठा सुरळीत सुरू आहे. त्याचप्रमाणे आज जिल्ह्यात रेमडिसिव्हीरची 8 हजार इंजेक्शनस व 50 मेट्रीक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. त्यानुसार रुग्णांना कोणत्याही औषधांची व ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही, यासाठी प्रशासनामार्फत योग्य उपाययोजना करण्यात येत आहेत. जसजसे ऑक्सिजनचे उत्पादन वाढेल, त्यानुसार उद्योगांनाही ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा, अशा सूचनाही भुजबळ यावेळी केल्या आहेत.

हेही वाचा -मराठा राजघराण्याचा गौरव; विजयाराजे सिंधियांच्या सन्मानार्थ १०० रुपयांचे नाणे जारी

पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कशी कमी करता येईल, यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. आजच्या स्थितीत शहराचा 'रिकव्हरी रेट' 91 टक्के असून मृत्यूदर 1.4 टक्के आहे. तर, ग्रामीण भागाचा 'रिकव्हरी रेट' 76 टक्के आहे, अशी माहितीही यावेळी भुजबळ यांनी दिली.

'तालुकास्तरावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑक्सिजन व व्हेंटिलेटरर्स सुविधा हाताळण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टर्स व इतर कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात यावे. त्याचप्रमाणे खासगी डॉक्टरांच्या सेवाही मानधन तत्त्वावर घेण्यात याव्यात. ज्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळून शासकीय व शहरातील रुग्णालयांवरील ताण कमी होण्यास मदत होईल. खासगी रुग्णालयांच्या बाबत होणाऱ्या तक्रारींकडे महानगरपालिका आयुक्तांनी लक्ष देऊन खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यात यावे,' असे ही भुजबळ यांनी सांगितले आहे.

'प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे आज मालेगावचा 'रिकव्हरी रेट' वाढला असून मालेगाव पॅटर्नचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे. मालेगावमध्ये संसर्ग कमी करण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचा अवलंब जिल्ह्यातील इतर तालुक्यांतही करण्यात यावा, ज्यामुळे जिल्ह्यांमधील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होईल,' असे भुजबळ यांनी सांगितले.

कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी लक्षात घेता येत्या नवरात्रोत्सवात जिल्ह्यामध्ये कोणत्याही यात्रेला परवानगी देण्यात येऊ नये. तसेच सप्तश्रृंग गडावर येणारे कावडधारक आणि ज्योत घेवून येणाऱ्या भाविकांनी गडावर न जाण्यासाठी त्यांचे प्रबोधन करण्यात यावे, अशा सूचनाही भुजबळ यांनी यावेळी दिल्या आहेत.

हेही वाचा -रामविलास पासवान पंचत्वात विलीन, मुखाग्नी देताना पुत्र चिरागची शुद्ध हरपली

Last Updated : Oct 11, 2020, 1:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details