नाशिक - नाशिक जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला असून जिल्हा पूर्णपणे म्युकरमायकोसिस मुक्त झाला आहे. (दि. 28 डिसेंबर)रोजी एकही म्युकरमायकोसिसचा रुग्ण सापडला नाही. (Mucormycosis Patient In Nashik) अशी महिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. दरम्यान, 785 म्युकरमायकोसिस पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. त्यापैकी 701 रुग्ण बरे झाले असून, 84 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्हा म्युकरमायकोसिसमुक्त झाला
कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना म्युकरमायकोसिससारखा नवा आजार आला आहे. यामध्ये त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिक जिल्ह्यात (Mucormycosis Patient Decreased Patient In Nashik) जवळपास 785 म्युकरमायकोसिस पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. त्यापैकी 701 रुग्ण बरे झाले असून 84 रुग्णांचा त्यामध्ये मृत्यू झाला आहे. मात्र, सुदैने नाशिक जिल्हा म्युकरमायकोसिसमुक्त झाला आहे.