महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चिंताजनक...नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला 701 वर - मालेगाव कोरोना न्यूज

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 701 वर जाऊन पोहचला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढलीय तर एकट्या मालेगावमध्ये 553 कोरोनाचे रुग्ण आहेत.

nashik corona patient number toll 701
नाशिक कोरोनाबाधितांची संख्या 701

By

Published : May 13, 2020, 11:24 AM IST

Updated : May 13, 2020, 12:27 PM IST

नाशिक- जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असून कोरोनाबाधितांचा आकडा 701 वर पोहोचला आहे. मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात 8 नवे रूग्ण आढळून आले आहेत. मालेगावात 6, निफाड 1, नाशिक मध्ये 1 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. मालेगाव शहरातील रुग्णांची संख्या 553 झाली आहे

कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला 701 वर

नाशिक शहरातील एका करोनाबाधित व्यक्तीला डॉ.झाकीर हुसेन रुग्णालय येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाच्या घराचा परिसर सील करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश नाशिकचे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले होते. आरोग्य विभागाच्या पथकाकडून रुग्णाच्या घराच्या परिसरातील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.

नाशिक जिल्ह्याची कोरोनाची आकडेवारी नाशिक शहर 40 , नाशिक ग्रामीण 86, मालेगाव 553 , इतर जिल्ह्यातील 22 रुग्ण अशी आहे. जिल्ह्यात 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोना आकडेवारी

नाशिक एनएमसी 40 नाशिक ग्रामीण रूग्ण 86 नाशिक 8 चांदवड 4 सिन्नर 6
दिंडोरी 6 निफाड 12 देवळा 0 नांदगाव 3 येवला 31
त्र्यंबक 0 सुरगाणा 0 पेठ 0 कळवण 0 सटाणा 2
इगतपुरी 0 मालेगाव तालुका ग्रामीण भाग 14 मालेगाव एमएमसी 553 इतर जिल्ह्यातील 22 एकूण मृत्यू:- 33
Last Updated : May 13, 2020, 12:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details