नाशिक -जिल्ह्याधिकारी कार्यालयातील प्रलंबित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी नागरिकांना आता थेट व्हाट्सअॅपद्वारे सेवा दिली जाणार आहे. या संकल्पनेचे नाशिककरांनी स्वागत केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक कामांसाठी नागरिकांची ये-जा असते. एखाद्या कामासाठी लागणारे कागदपत्र अपुरे असल्यास प्रकरण वेळेत मंजूर होत नाही. परिणामी, नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ चौकशी करण्यासाठी चकरा माराव्या लागतात. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी प्रलंबित प्रकरणांच्या माहिती संदर्भात व्हाट्सअॅप सेवा सुरू केली आहे.