महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आोलांडला नऊ हजारांचा टप्पा - कोरोना वायरस केसेस नाशिक

शनिवारी ३९३ कोरोनाबाधित वाढल्याने जिल्ह्यातील रुग्णसंख्या ९ हजार ०७५ वर गेली आहे. या पैकी ६ हजार ०३९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या २ हजार ६५३ रुग्णांवर उपचार सुरु असून ३८३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Nashik Corona Update
नाशिक कोरोना अपडेट

By

Published : Jul 19, 2020, 11:38 AM IST

नाशिक- जिल्ह्यात दिवसभरात ३९३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा नऊ हजारांच्या पुढे गेला आहे. शनिवारी दिवसभरात आणखी १२ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची संख्या ३८३ वर गेली आहे

नाशिकमध्ये कोरोनाचे मोठ्या संख्येने आढळणारे रुग्ण सर्वसामान्यांबरोबरच जिल्हा आणि महापालिका प्रशासनासाठी देखील धडकी भरवणारे ठरले आहेत. शुक्रवारी नाशिक शहरात विक्रमी ४०३ तर जिल्ह्यात एकूण ५८८ कोरोनावाधित आढळल्याने प्रशासकीय यंत्रणा हादरून गेली. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी नाशिक शहरात २१९, ग्रामीण भागात १६६, मालेगावात ८ अशा प्रकारे एकूण ३९३ नवे कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ९०७५ वर पोहोचला आहे.

शनिवारी दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये तब्बल १ हजार २२४ कोरोना संभाव्य रुग्ण दाखल झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. यात नाशिक जिल्हा रुग्णालयात १४, नाशिक महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सर्वाधिक ७४९, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे ४, मालेगाव सामान्य रुग्णालयात १८, तर नाशिकच्या ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये ३५४ नवे संभाव्य रुग्ण दाखल झाले. याशिवाय ८५ संशयितांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.

एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना शनिवारी दिवसभरात ३१६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची दिलासादायक बातमी आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या ९०७५ कोरोनाबाधितांपैकी एकूण ६०३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यात नाशिक ग्रामीणमधील १३६१, नाशिक महापालिका क्षेत्रातील ३५७५, मालेगाव मनपा क्षेत्रातील ९८५, तर जिल्हाबाह्य ११८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत २६५३ रूग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details