नाशिक- शहर व जिल्ह्यात शनिवारी (दि. ८ जानेवारी ) १ हजार १०३ नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली ( Nashik Corona Update ) आहे. यापैकी एकट्या नाशिक शहरात ८५७ कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यामुळे तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
देशासह राज्यात कोरोनाचा कहर सुरू असून कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जिल्ह्यात आढळलेल्या १ हजार १०३ नव्या कोरोनाग्रस्तांपैकी नाशिक शहरात ८५७ रुग्ण, ग्रामीण भागात २०१, मालेगावमध्ये ६ तर जिल्हाबाह्य ३९ रुग्णांचा समावेश आहे.
२ हजार ५६६ सक्रिय रुग्ण -आतापर्यंत ४ लाख १६ हजार ६३८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख ५ हजार ३०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात २ हजार ५६६ सक्रिय रुग्ण ( Active Patients in Nashik ) असून त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.